व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातील फोटो फेसबुकवर शेअर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:13 AM2021-02-10T04:13:59+5:302021-02-10T04:13:59+5:30
धारणी : खोज या सामाजिक संस्थेचे संस्थापक सदस्य पौर्णिमा उपाध्याय यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात जाऊन तेथील ...
धारणी : खोज या सामाजिक संस्थेचे संस्थापक सदस्य पौर्णिमा उपाध्याय यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात जाऊन तेथील वृक्षांची छायाचित्रे फेसबुकवर शेअर केल्याने त्यांना वनविभागाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. या घटनेबाबत आपण दि. ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता वनपरिक्षेत्र अधिकारी, हरिसाल यांच्या कार्यालयात उपस्थित राहण्याबाबतची नोटीस ४ फेब्रुवारी रोजी बजावण्यात आली.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गाभा क्षेत्रातील गावांचे एैच्छिक पुनर्वसन प्रक्रिया सुरू आहे. यादरम्यान आपण गाभा क्षेत्रातील वृक्षांचे फोटो आपल्या अकाउंटमधून पोस्ट केले. त्या फोेटोंची पाहणी केली असता ते गाभा क्षेत्रातील असल्याचे स्पष्ट होते. गाभा क्षेत्रात प्रवेश करणे कायदेशीर गुन्हा असल्याचे सांगत वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी उपाध्याय यांना नोटीस बजावली. दरम्यान, दि. ९ फेब्रुवारी रोजी उपाध्याय उपस्थित झाल्या किंवा कसे? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा व दीपाली चव्हान यांचा मोबाइल क्रमांक नॉट रिचेबल येत होता.