आदिवासी वृद्धेशी अश्लील चाळे करून फोटोसेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 10:39 PM2018-12-29T22:39:06+5:302018-12-29T22:39:27+5:30

शहरात भरदिवसा एका ६० आदिवासी वृद्धेला बळजबरीने दुकानात बोलावून तिच्याशी अश्लील चाळे करण्यात आले. एवढेच नव्हे तर त्याने घटनेचे चित्रीकरण करून समाज माध्यमात व्हायरल केल्याची धक्कादायक घटना २८ डिसेंबर रोजी सकाळी उघड झाली.

Photostation by tribal pornographic pornography | आदिवासी वृद्धेशी अश्लील चाळे करून फोटोसेशन

आदिवासी वृद्धेशी अश्लील चाळे करून फोटोसेशन

Next
ठळक मुद्देयुवकाचा प्रताप : धारणी येथील घटना, यापूर्वीही गुन्ह्यांची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्क
धारणी : शहरात भरदिवसा एका ६० आदिवासी वृद्धेला बळजबरीने दुकानात बोलावून तिच्याशी अश्लील चाळे करण्यात आले. एवढेच नव्हे तर त्याने घटनेचे चित्रीकरण करून समाज माध्यमात व्हायरल केल्याची धक्कादायक घटना २८ डिसेंबर रोजी सकाळी उघड झाली.
संबंधित वृद्धेच्या तक्रारीवरून धारणी पोलिसांनी वसीम सौदागर (३०) याच्याविरुद्ध भादंविचे कलम ३५४ अ सह कलम ३, १, ४, एसडब्ल्यू, ३ झेड, व्हीव्हीए , अ‍ॅट्रॉसिटीसह आयटी अ‍ॅक्टमधील कलम ६७ अन्वये गुन्हा दाखल केला. तक्रारीनुसार, शुक्रवारी सकाळी ८ च्या सुमारास आदिवासी वृद्धा भांडे घासून परत जात होती. त्यावेळी आरोपी हा सौदागर नामक दुकानात बसला होता. त्याने या वृद्धेस बोलावले. तिने नकार देताच वसीमने बळजबरीने ओढून तिच्याशी अश्लील चाळे केले. आदिवासी संघटनांनी सदर महिलेला घेऊन शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास धारणी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली.

वसीमकडून २०१५ ची पुनरावृत्ती
आरोपी वसीमने याआधी सन २०१५ च्या डिसेंबर महिन्याच्या शेवटी एका आदिवासी मुलीवर बलात्कार केला होता. तेव्हा आदिवासी संघटनेने १ जानेवारी २०१६ रोजी धारणी शहर बंद केले होते. त्यानेच पुन्हा आदिवासी महिलेची छेडखानी केल्याने आदिवासी संघटनांमध्ये आरोपीविरोधात तीव्र संताप आहे. खबरदारी म्हणून मध्यरात्रीच दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे.
आरोपीस अटक
गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी, एपीआय प्रीती निचळे यांच्यासह पोलीस पथकाने शुक्रवारी रात्री ११ वाजता आरोपीच्या घरी धाड टाकली. आरोपीने मागील दरवाज्याने पळ काढला. त्यानंतर मोबाइल लोकेशन घेऊन रात्री ४ वाजेपर्यंत आरोपीचा शोध घेण्यात आला. शनिवारी सकाळी ९ च्या सुमारास त्यास अटक करण्यात आली. घटनेचा तपास प्रभारी उपविभागीय अधिकारी सोयम मुंडे यांच्याकडे आहे.

आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. सन २०१५ मध्येसुद्धा त्याने असेच गैरकृत्य केले होते. फिर्यादी व धारणीकर जनतेने तपासात सहकार्य केल्यास तो कठोर शिक्षेस पात्र ठरू शकेल.
- सोयम मुंडे,
प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी, धारणी

Web Title: Photostation by tribal pornographic pornography

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.