अल्पवयीन मुलीवर अत्याचार, सतत पाठलाग करून बदनामीची धमकी; गुन्हा दाखल

By प्रदीप भाकरे | Published: February 13, 2023 04:14 PM2023-02-13T16:14:46+5:302023-02-13T16:18:31+5:30

धामणगाव रेल्वे तालुक्यातील घटना

physical abuse of a minor girl, threat of defamation, fir against accused | अल्पवयीन मुलीवर अत्याचार, सतत पाठलाग करून बदनामीची धमकी; गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, सतत पाठलाग करून बदनामीची धमकी; गुन्हा दाखल

Next

अमरावती : एका अल्पवयीन मुलीशी जवळीक साधून तिच्यावर शारीरिक अत्याचार करण्यात आला. ती छळमालिका तेवढ्यावरच थांबली नाही, तर तिला तिच्या बदनामीची धमकी देखील देण्यात आली.

धामणगाव रेल्वे तालुक्यातील दत्तापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २२ ऑगस्ट २०२२ ते १२ फेब्रुवारी २०२३ दरम्यान पिडिताशी तो अश्लाघ्य प्रकार चालला. याप्रकरणी दत्तापूर पोलिसांनी १६ वर्षे ५ महिने वयाच्या त्या पिडित मुलीच्या तक्रारीवरून १२ फेब्रुवारी रोजी आरोपी घनशाम उध्दवराव ओंकार (५०, ता.धामणगाव) याच्याविरूध्द बलात्कार, विनयभंग, जीवे मारण्याची धमकी व पोस्कोअन्वये गुन्हा दाखल केला. तक्रारीनुसार, यातील पिडित मुलगी व आरोपी घनशाम हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. त्या परिचयातून आरोपीने तिच्याशी जवळीक साधली. तिला प्रलोभन दिले. २२ ऑगस्ट २०२२ च्या पुढे तिच्यावर शारीरिक बळजबरी केली. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर पीडितेचा शाळेपर्यंत पाठलाग करून तिला घटनेची वाच्यता करू नकोस, असा दम भरला. कुणाला सांगितल्यास बदनामी करण्याची धमकी त्याने दिली.

घरी जाऊन विनयभंग

त्या अश्लाघ्य घटनेपासून ती त्याला टाळू लागली. रस्ता बदलून घरी जाऊ लागली. त्यामुळे एक दिवस तो थेट तिच्या घरी पोहोचला. तेथे तिचा विनयभंग केला. तथा तिच्यासह तिच्या आईवडिलांना जीवे मारण्याची धमकी देऊन तो तेथून निघून गेला. संपुर्ण घटनाक्रम जाणून घेतल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी तिला बळ दिले. अखेर तिने मनाचा हिय्या करत १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी दत्तापूर पोलीस ठाणे गाठले. महिला पोलीस अधिकाऱ्यांनी तिची आपबिती नोंदवून घेत आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला.

Web Title: physical abuse of a minor girl, threat of defamation, fir against accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.