महिलेचे शारीरिक शोषण; जबरीने गर्भपात अन् लग्नास नकार; गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2022 11:21 AM2022-10-28T11:21:31+5:302022-10-28T11:21:47+5:30

पीडितेला बेदम मारहाण

physical abuse of women; Forced abortion and denial of marriage | महिलेचे शारीरिक शोषण; जबरीने गर्भपात अन् लग्नास नकार; गुन्हा दाखल

महिलेचे शारीरिक शोषण; जबरीने गर्भपात अन् लग्नास नकार; गुन्हा दाखल

googlenewsNext

अमरावती : लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेचे वारंवार लैंगिक शोषण करण्यात आले. त्या संबंधातून तिला गर्भधारणा झाली. त्यानंतरही लग्न न करता जबरीने गर्भपात करण्यात आला. माहुली परिसरातील एका हॉटेलमध्ये १५ फेब्रुवारी ते २७ ऑगस्टदरम्यान तिचे शोषण करण्यात आले. याप्रकरणी पीडिताच्या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी २६ ऑक्टोबर रोजी आरोपी अरसलाम काझी वल्द आमिर काझी (२७, रा. नूरनगर, नागपुरी गेट) याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

वडिलांचे निधन झाल्यानंतर पीडिता ही जमील कॉलनी परिसरातील एका रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करीत होती. त्याच परिसरातील दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये आरोपी काम करीत होता. त्यातून दोघांची ओळख झाली. प्रेमालाप वाढला. सोशल मीडियावर ते व्यक्त होऊ लागले. त्यातच आपले तुझ्यावर प्रेम असून, लग्न करायचे आहे, अशा भूलथापा त्याने दिल्या. १५ फेब्रुवारी रोजी आरोपी तिला माहुली परिसरातील एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. तेथे शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर सहा ते सात वेळा त्याने तिचे शोषण केले. त्यावेळी पीडिताने त्याला लग्नाबाबत विचारणा केली. त्यावर तुझी आई हुंड्यात काय देणार, अशी माझी आई विचारत असल्याचे तो तिला म्हणाला. सुमारे पाच महिन्यांपूर्वी पीडिताने तिला झालेल्या गर्भधारणेबाबत त्याला माहिती दिली. त्यावर त्याने तिला गर्भपात करण्याचा सल्ला दिला.

पीडितेला बेदम मारहाण

पीडिताने गर्भपात करण्यास नकार दिला असता त्याने तिला बेदम मारहाण केली. त्याने मेडिकलमधून औषध आणून ते पीडिताला जबरीने पाजले. त्यामुळे तिचा गर्भपात झाला. एव्हाना आरोपीचे वागणे तिच्या लक्षात आले होते. त्यामुळे तिने बडनेरा पोलीस ठाणे गाठले. आरोपीने आपल्याला लग्नाचे आमिष दाखविले. शरीरसंबंध प्रस्थापित केले तथा जबरीने गर्भपात घडवून आणला, अशी तक्रार तिने नोंदविली. बडनेराचे सहायक पोलीस उपनिरीक्षक अहमद अली तपास करीत आहेत.

Web Title: physical abuse of women; Forced abortion and denial of marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.