बेडरूममध्ये कोंडून तरुणीवर अतिप्रसंग, गर्भारपणामुळे उलगडा

By प्रदीप भाकरे | Published: August 4, 2023 01:44 PM2023-08-04T13:44:28+5:302023-08-04T13:47:01+5:30

आरोपी धामणगाव रेल्वे तालुक्यातील चिंचोलीचा

physical abuse on young woman locked in bedroom, unfold the case due to pregnancy | बेडरूममध्ये कोंडून तरुणीवर अतिप्रसंग, गर्भारपणामुळे उलगडा

बेडरूममध्ये कोंडून तरुणीवर अतिप्रसंग, गर्भारपणामुळे उलगडा

googlenewsNext

अमरावती : धामणगाव रेल्वे तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका २२ वर्षीय तरूणीवर अतिप्रसंग करण्यात आला. यवतमाळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ती उपचारार्थ दाखल असताना ती चार महिन्यांची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. तिच्या बयाणावरून यवतमाळ शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मात्र घटनास्थळ मंगरूळ दस्तगीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने ती गुन्हा वर्ग करण्यात आला. याप्रकरणी, मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी पिडिताच्या तक्रारीवरून ३ ऑगस्ट रोजी रात्री १०.३४ वाजताच्या सुमारास आरोपी सुरज केशवराव ठाकरे (रा. चिंचोली, ता. धामणगाव रेल्वे) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला.             

पीडिता ही यवतमाळ येथे मावशीकडे राहते. ती यंदाच्या सुरूवातीला धामणगाव रेल्वे तालुक्यातील आष्टा येथे आली असताना तेथे तिची एका आजीसोबत ओळख झाली. त्यातून तिची आरोपी सुरज ठाकरे याच्याशी ओळख होऊन प्रेमसंबंध निर्माण झाले. अशातच त्याने १४ फेब्रुवारी रोजी तिला स्वत:च्या घरी बोलावले. तेथे घराच्या बेडरूममध्ये कोंडून तिच्यावर अतिप्रसंग केला. दरम्यान ती महिनाभरापुर्वी गुजरातमधील आश्रमात गेली. मात्र तेथे ती तीन महिन्यांची गर्भवती असल्याचे लक्षात येताच तेथील आश्रमातील संबंधितांनी तिला यवतमाळला परत पाठविले. दरम्यान, ती यवतमाळला परतली.

काही दिवसांपुर्वी तिचे पोट दुखत असल्याने तिला तिच्या मावशीने तेथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. सोनोग्राफीदरम्यान ती चार महिन्यांची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे तिच्या मावशीने तिला त्याबाबत जाब विचारला. त्यातून आरोपीने नाव उघड झाले. ती गर्भपातासाठी तेथे दाखल झाली होती.

Web Title: physical abuse on young woman locked in bedroom, unfold the case due to pregnancy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.