वाढोण्यात खताचे ढिगारे, आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:10 AM2021-07-24T04:10:00+5:302021-07-24T04:10:00+5:30
दूषित पाण्याचा वापर : नाल्या तुडुंब भरल्या वाढोणा रामनाथ: गावात जागोजागी शेणाचे ढिगारे आहे. नाल्या तुडुंब भरल्या आहे. ...
दूषित पाण्याचा वापर : नाल्या तुडुंब भरल्या
वाढोणा रामनाथ: गावात जागोजागी शेणाचे ढिगारे आहे. नाल्या तुडुंब भरल्या आहे. पावसाच्या पाण्याने पिण्याचे पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे.
पाच हजार लोकसंख्येच्या गावात सर्वत्र सिमेंट रोड व नाल्याचे पक्के बांधकाम झाले आहे. परंतु नाल्या तुडुंब भरल्या आहे. त्यामध्ये गाळ प्लास्टिक चे कागद कचरा दगड यामुळे पाणी अडले आहे. येथील अंगणवाडी जवळ असलेल्या कूपनलिका शेजारी पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. कुपनलिका मधून पाणी टाक्यात येते पण पाणी भरण्यासाठी. टाळ्याला नळ
नाही. टाकी चे जवळ पाण्याचे डबके साचले आहे. डबक्या तील पाणी पाझर कूपनलिका मधे जात आहे त्यामुळे जनतेला दूषित पाणी पायवे लागत आहे. गावातील प्रत्येक हात पंपा जवळ गवत वाढले आहे. पाणी साचले आहे. कचऱ्याचे ढीग आहे. गावच्या कोंड वाडा जवळील हापशी चे बाजूला जनतेसाठी ग्रामपंचा त चां नाळ आहे. बाजूला नाली आहे नालीतील पाणी हात पंप मधे येते तेच पाणी लोक पितात. गावातील प्रत्येक रस्त्याने शेन खत मोठं मोठं ढीग आहे इंधन ठेवले आहे. त्यामुळं सरपटणारे प्राणी नेहमी दिसतात. झेंडा चोक परिसरात वस्ती मध्ये सुमारे अक्कर भर जागेत शेवाळ आलेले पाण्याचे डपके साचले आहे. त्याठिकाणी नालीचे बांधकाम अद्याप झाले नाही. डेंग्यू होण्याचा धोका वाढला आहे. हिरवेगार गवत घराच्या. आजूबाजूने वाढले आहे. गल्लीबोळ तून. जि व. मुठीत घेऊन लोकांना जावे लागते.
तात्काळ ग्राम पंचायत ने कारवाई करण्याची मागणी. लोकांनी केली आहे.
कोड
गावातील सर्व. नाल्याची पाहणी करणार आहे. हात पंप जवळची साफसफाई करून घेते. खताचे ढीग ज्यांचे असेल त्यांना नोटीस दिली जाईल.
सविता तिरमारे
सरपंच
ग्रापंचायत वाढोना
कोड
जनतेच्या आरोग्याला धोका आहे दूषित पाणी मुळे डायरी या व डेंग्यू होऊ शकतो.
Dr . Mobin Khan
आरोग्य अधिकारी
Wadhona