चुटकी पें चाय ! (कुजबुज)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:09 AM2021-06-22T04:09:45+5:302021-06-22T04:09:45+5:30
साहेब कक्ष सेवकाला सांगतील किंवा कॅन्टीनवर फोन करतील, अशी अपेक्षा बाळगून असलेल्या अभ्यागताला हा आश्चर्याचा धक्का असतो. किंबहुना चहा ...
साहेब कक्ष सेवकाला सांगतील किंवा कॅन्टीनवर फोन करतील, अशी अपेक्षा बाळगून असलेल्या अभ्यागताला हा आश्चर्याचा धक्का असतो. किंबहुना चहा भेटणारच नाही, अशी त्याची समजूत असते. कारण जिल्हा परिषदेच्या कोरोनामुळे तूर्तास टाळे लागले आहे. मात्र काही बेरोजगारांनी हातात किटली घेऊन फिरस्ती चहा हा नवा प्रकार सुरु केला आहे. या चहाविक्रेत्यांचा एक डोळा नेहमी दुसऱ्या मजल्यावर असतो. कक्षसेवकाने खाली पाहत विशिष्ट इशारा केला की, ते हजर होतात. कोरोनाचे जाऊ द्या हो, पण आळस घालवण्यासाठी चहा आवश्यक आहे, याबाबत जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये एकमत आहे.
जितेंद्र दखणे, अमरावती