पिस्तुलातून गोळी झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 10:50 PM2019-07-02T22:50:57+5:302019-07-02T22:51:14+5:30

पिस्तुलातून गोळी झाडून एका किराणा व्यावसायिकाला जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना सोमवारी रात्री अन्सारनगरात घडली. या प्रकरणात नागपुरी गेट पोलिसांनी एहतेशाम ऊर्फ आलीशान अहमद मोहम्मद फारूक (२५, रा. अन्सारनगर, रजा मशीदजवळ) याला अटक केली. आलीशान हा नावेद बिल्डर हत्याकांडातील आरोपी होता.

Pistols shot and tried to kill them | पिस्तुलातून गोळी झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न

पिस्तुलातून गोळी झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न

Next
ठळक मुद्देअन्सारनगरातील घटना : नावेद बिल्डर हत्याकांडातील आरोपी होता आलीशान

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पिस्तुलातून गोळी झाडून एका किराणा व्यावसायिकाला जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना सोमवारी रात्री अन्सारनगरात घडली. या प्रकरणात नागपुरी गेट पोलिसांनी एहतेशाम ऊर्फ आलीशान अहमद मोहम्मद फारूक (२५, रा. अन्सारनगर, रजा मशीदजवळ) याला अटक केली. आलीशान हा नावेद बिल्डर हत्याकांडातील आरोपी होता.
अन्सारनगरातील रहिवासी मोहम्मद शकील मोहम्मद अकील अन्सारी (४३) यांचे किराणा दुकान असून, त्यांच्या दुकानासमोर काही तरुण हुल्लडबाजी करीत होते. त्यांनी यावेळी आलीशानला हटकले. दुकानासमोर हुल्लडबाजी करू नका, दुकानासमोर गुन्हेगार बसवू नका, असे नागरिक म्हणत असल्याचे मोहम्मदने सांगितले. त्यावेळी आलीशान वीट उचलून मोहम्मदच्या अंगावर धावून गेला, शिवीगाळ केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आलीशान घरी गेला आणि पाच मिनिटांत पिस्तूल हाती घेऊन मोहम्मदच्या दुकानासमोर आला. आलीशानने मोहम्मदसमोर पिस्तुलात गोळ्या भरल्या आणि ते त्याच्या दिशेने ताणले.
पिस्तूल ताणल्याचे पाहून मोहम्मद खाली बसला. त्यामुळे गोळी त्याला लागली नाही. यादरम्यान तेथे उपस्थित सज्जू आणि गोलू नामक इसम ओरडल्यामुळे आलीशान तेथून पळून गेला. या घटनेची तक्रार मोहम्मद शकीलने नागपुरी गेट पोलिसांत नोंदविली.
पोलिसांनी आलीशान अहमदविरुद्ध भादंविच्या कलम ३०७, २९४, ५०६ (ब) व ३/२५ आर्म्स अ‍ॅक्टनुसार गुन्हा नोंदविला आणि त्याला अटक केली. त्याला सोमवारी न्यायालयात हजर करून कोठडीची मागणी पोलिसांनी केली. पोलिसांना आलीशानकडून पिस्तूल अद्याप मिळालेले नाही.
नावेद बिल्डर हत्याकांडातील आरोपी
वलगाव रोड स्थित असोरीया पेट्रोल पंपासमोर घडलेल्या नावेद बिल्डर हत्याकांडात आलीशान अहमद हा आरोपी होता. हे हत्याकांड देशपातळीवर गाजले होते. या प्रकरणाचा खटला न्यायालयात सुरू असताना फिर्यादी व आरोपी पक्षांचे वाद झाले होते. या प्रकरणात पोलिसांवर प्रचंड दबाव होता. खटल्यातील आरोपींची निर्दोष सुटका झाली होती.

हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना किराणा व्यापाºयाने हटकले असता, आरोपी आलीशानने पिस्तूल ताणले. त्याला अटक करण्यात आली आहे.
- अर्जुन ठोसरे, पोलीस निरीक्षक, नागपुरी गेट पोलीस ठाणे.

Web Title: Pistols shot and tried to kill them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.