एक किलोमीटरच्या रस्त्यात शंभरांवर खड्डे
By Admin | Published: November 25, 2014 10:48 PM2014-11-25T22:48:17+5:302014-11-25T22:48:17+5:30
अमरावती ते परतवाडा या राज्य महामार्गावरील वलगाव ते आष्टी, पूर्णानगर ते आसेगाव आणि मेघनाथपूर फाटा ते चांदूरबाजार नाका या मार्गावर डांबरी रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे.
अमरावती : अमरावती ते परतवाडा या राज्य महामार्गावरील वलगाव ते आष्टी, पूर्णानगर ते आसेगाव आणि मेघनाथपूर फाटा ते चांदूरबाजार नाका या मार्गावर डांबरी रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. केवळ एक-एक किलोमिटर अंतरावर शंभरांवर खड्डे पडलेले आहेत. लहान खड्ड्यांची संख्या तर अगिणत आहे. राज्य महामार्ग असलेल्या या रस्त्यावरुन चालणे धोक्याचे ठरत आहे. परिणामी वाहतूक करणारे नागरिक वैतागले आहे. वर्षभराचा कालावधी लोटूनही याकडे या रस्त्याच्या दुरुस्तीकडे लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष होत आहे.
अमरावती ते परतवाडा या राज्य महामार्गावरून दररोज शेकडो वाहने धावतात. या मार्गावर रस्ता दुरूस्तीचे काम झाले असले तरी काही ठिकाणच्या टप्प्यात अद्यापही रस्त्याचा प्रवास खडतर होऊन बसला आहे. यात पहिला टप्पा वलगाव बसस्थानकापासून ते आष्टी फाट्यापर्यंत, त्यानंतर पूर्णानगर ते आसेगाव आणि मेघनाथपूर ते चांदूरबाजार स्टॉप या तीन टप्प्यातील राज्य महामार्गावर एक ते तीन किलोमीटर अंतरावर डांबरी रस्त्याचा प्रवास खडतर झाला आहे.
गरोदर मातांना दुचाकी वाहनाने जाता-येताना रस्त्याच्या दुरावस्थेमुळे असाह्य वेदनाचा सामना करावा लागतो. ऐवढेच नव्हे तर वयोवृध्द नागरिक व इतर सर्वच नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो. तसेच रस्त्यावरील जागोजागी खड्डे, उखडली गिट्टी, डांबर माथ्याचे ठिगळ यामुळे वाहनधारकांना वाहन चालविताना नाहक मन:स्ताप सहन करावा लागतो.
यामुळे अपघाताच्याही घटना घडत आहे. यापूर्वी रस्त्याच्या दुरावस्थेमुळे या मार्गावर काही महिन्यापूर्वी एसटी बसचा आणि किरकोळ अपघाताच्या घटना घडल्यानंतर बांधकाम विभाग अद्यापही जागा झाला नाही त्यामुळे अमरावती ते परतवाडा या राज्य महामार्गावरील ज्या ठिकाणी मार्गात रस्त्याची चाळण झाली आहे आणि खड्डे पडले आहे. त्यामुळे हा रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी होते आहे.