५० लाख घरकुलांचे नियोजन

By admin | Published: September 8, 2015 12:16 AM2015-09-08T00:16:39+5:302015-09-08T00:16:39+5:30

राज्यातील गरीब आणि गरजूंना येत्या पाच वर्षांत ५० लाख घरकूल बांधून देण्यात येतील, अशी माहिती राज्याचे उद्योग, ...

Planning of 50 million homes | ५० लाख घरकुलांचे नियोजन

५० लाख घरकुलांचे नियोजन

Next

पालकमंत्री प्रवीण पोटे : अचलपूर येथे सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन
अचलपूर : राज्यातील गरीब आणि गरजूंना येत्या पाच वर्षांत ५० लाख घरकूल बांधून देण्यात येतील, अशी माहिती राज्याचे उद्योग, खनिकर्म, पर्यावरण, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) राज्यमंत्री तथा पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिली.
अचलपूर येथील सुलतानपुरा भागात रविवारी केंद्रशासन पुरस्कृत एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रमांतर्गत सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष रंगलाल नंदवंशी होते. नगरपरिषदेचे उपाध्यक्ष मोहम्मद गनी, बांधकाम सभापती ममता उपाध्याय, माजी नगराध्यक्ष कल्लू महाराज दीक्षित, नगरसेविका अल्का उईके, लक्ष्मी बघिले, जिल्हाधिकारी किरण गित्ते, उपविभागीय अधिकारी शामकांत मस्के, तहसीदार मनोज लोणकर आदी व्यासपीठावर होते.
नगरपरिषदांच्या माध्यमातून विकास कामे व्हावीत, यासाठी प्रथमच जिल्ह्यातील प्रत्येक नगरपरिषदांना २ कोटीचा निधी देण्यात आला. या निधीतून करण्यात येणारी कामे दर्जेदार झाली पाहिजेत. लोकसहभागातून अनेक योजना चांगल्याप्रकारे यशस्वी होतात ही बाब नागरिकांनी विचारात घेऊन विकास कामात लोकसहभाग द्यावा. असे आवाहन पालकमंत्र्यांनी योवळी केले. भूमिपूजन होत असलेल्या सभागृहातून चांगल्या संस्काराद्वारे मुलांची जडणघडण करावी. बांधकाम झालेली वास्तू सामाजिक कायार्साठी उपयोगात राहील यादृष्टीने समाज बांधवांनी त्या इमारतीची देखभालसुध्दा करावी असेही पालकमंत्र्यानी यावेळी स्पष्ट केले. या कार्यक्रमाअंतर्गत कायार्रंभ आदेशाचे वितरण पालकमंत्र्यांनी संबंधित कंत्राटदारांना केले. नगरपरिषदमार्फत राबविण्यात येणा?्या विकास कामात लोकांनी सहकार्य करावे. असे आवाहन नगराध्यक्ष रंगलाल नंदवंशी यांनी अध्यक्षीय भाषणात केले. या जुळ्या शहराच्या विकासासाठी अजून निधीची आवश्यकता भासणार आहे. रस्ते विकास प्रस्ताव सादर करण्यात आला. त्याला मंजूरी देण्यात यावी. अशी विनंती नगराध्यक्षांनी यावेळी केली. अचलपूर-परतवाडा शहराच्या विकासासाठी नगरपरिषदेने अतिक्रमणधारकांची यादी तयार करुन कार्यवाही करणे आवश्यक आहे. तरच विकास कामे चांगल्या प्रकारे होतील असे प्रतिपादन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी केले. नगरपरिषदने विकास कामाचा चांगला आराखडा तयार केल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपरिषदेचे अभिनंदन केले. सी.सी. टीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, असे त्यांनी यावेळी सांगितले. (ता. प्रतिनिधी)

Web Title: Planning of 50 million homes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.