विद्यापीठाच्या कला, वाणिज्य, विज्ञान ऑनलाईन परीक्षांचे ८ मेपासून नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:13 AM2021-05-25T04:13:44+5:302021-05-25T04:13:44+5:30
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कला, वाणिज्य व विज्ञान शाखांच्या ऑनलाईन परीक्षांचे ८ मेपासून नियोजन करण्यात येणार आहे. ...
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कला, वाणिज्य व विज्ञान शाखांच्या ऑनलाईन परीक्षांचे ८ मेपासून नियोजन करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने परीक्षा विभागात वेळापत्रक तयार करण्याची लगबग सुरू झाली असून, या परीक्षा महाविद्यालय स्तरावर होणार आहेत.
विद्यापीठाने विधी, फार्मसी व अभियांत्रिकी परीक्षांचे ऑनलाईन नियोजन केले. विना अडथळ्यांनी ही परीक्षा आटोपली. केवळ अभियांत्रिकी सत्र १ च्या परीक्षा ३० मेपर्यंत चालणार असल्याची माहिती आहे. मात्र, वर्षभरापासून रखडलेली हिवाळी- २०२० च्या कला, वाणिज्य व विज्ञान शाखांच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यात येणार आहे. त्याकरिता परीक्षा मंडळाची मान्यता घेण्यात येणार आहे. प्राचार्य, महाविद्यालयांच्या संचालकांना या ऑनलाईन परीक्षांबाबत अवगत करण्यात आले आहे. विद्यापीठाने आतापर्यंत एक हजार विषयांची ऑनलाईन परीक्षा घेण्याची किमया पार पाडली. आता परीक्षा मंडळाने मान्यता देताच कला, वाणिज्य व विज्ञान शाखांची ऑनलाईंन परीक्षा सुकर पार पाडण्यात येणार आहे.
----------------------
विधी, फार्मसी, अभियांत्रिकी परीक्षा आटोपल्या
विद्यापीठाने विधी, फार्मसी व अभियांत्रिकीच्या ४ मेपासून सुरू केलेल्या ऑनलाईन परीक्षा सुकर पार पाडल्या आहेत. परीक्षा होताच स्वंयचलित गुणांकनाची प्रक्रिया आटोपली. अभियांत्रिकीचे सत्र १ च्या परीक्षा ३० मेपर्यंत चालणार आहेत. काही विषयांचे निकाल जाहीर झाले असून, गुणपत्रिका तयार होत आहे. कोरोना संक्रमणामुळे संचारबंदी लागू आहे. त्यामुळे महाविद्यालये बंद असून, लवकरच विद्यार्थ्यांना गुणपत्रिका वितरित केल्या जातील, अशी माहिती आहे.
-------------------------------
कोट
कला, वाणिज्य व विज्ञान शाखांच्या ऑनलाईन परीक्षांचे नियोजन ८ मेपासून करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने वेळापत्रक तयार करण्यात येत आहे. परीक्षा मंडळाची मान्यता मिळताच परीक्षा घेण्यात येतील.
- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मू्ल्यांकन मंडळ