केंद्रीय परिवहन मंत्र्यांनी हात केले वर बांधकाम मंत्र्यांनी पळविले नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 05:00 AM2021-09-04T05:00:00+5:302021-09-04T05:01:05+5:30

अमरावती-परतवाडा प्रमुख राज्य महामार्गाचे ५४ किलोमीटर लांबीचे काम सन २०१८ मध्ये एशियन डेव्हलपमेंट बँकेकडे (एडीबी) देण्यात आले होते. एडीबीने या प्रमुख रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामास तत्त्वतः मान्यताही दिली. रस्त्याचे सर्वेक्षण 1१२ सप्टेंबर २०१९ ला भोपाळ येथील आयकॉन इंजिनीअरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे दिले. कंपनीने सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले. त्याचा डीपीआरही बनवला. जवळपास साडे सहाशे कोटी त्यावर खर्च अपेक्षित होता. या रस्त्याचे काम सुरु होण्याच्या अंतिम टप्प्यात होते.

Planning was hijacked by the construction minister on the hands of the Union transport minister | केंद्रीय परिवहन मंत्र्यांनी हात केले वर बांधकाम मंत्र्यांनी पळविले नियोजन

केंद्रीय परिवहन मंत्र्यांनी हात केले वर बांधकाम मंत्र्यांनी पळविले नियोजन

Next

अनिल कडू
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : अमरावती- परतवाडा- धारणी बऱ्हाणपूर- इंदोर या आंतरराज्य मार्गाकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. आजही हा मार्ग दुर्लक्षित आहे. खड्ड्यांसह अपघाताची मालिका सालाबादाप्रमाणे यंदाही सुरू झाली आहे. हा रस्ता लोकांच्या जीवावर उठला आहे. या रस्त्याच्या अनुषंगाने नितीन गडकरींनी आपले हात वर केले, बांधकाम मंत्र्यांनी नियोजन पळविळ्याने ही समस्या नागरिकांच्या जिव्हारी लागली आहे. 
माजी खासदार अनंत गुढे यांच्या पत्राला उत्तर देताना हा राज्य महामार्ग महाराष्ट्र शासनाच्या पीडब्ल्यूडीकडे मेंटेनन्सकरिता असल्याचे त्यांनी ३० जूनच्या पत्रात म्हटले आहे. महाराष्ट्र शासनाचे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी एशियन डेवलपमेंट बँक(एडीबी )अंतर्गत या रस्त्याचे मार्गी लागलेले काम काढून घेतले आहे. यात अमरावती जिल्ह्यात एडीबीला अधिक लांबीचे रस्ते दिल्याचे कारण पुढे केले गेले. या मार्गाचे काम हायब्रीड ॲन्युइटी अंतर्गत घेण्यास सुचविले. 
अमरावती-परतवाडा प्रमुख राज्य महामार्गाचे ५४ किलोमीटर लांबीचे काम सन २०१८ मध्ये एशियन डेव्हलपमेंट बँकेकडे (एडीबी) देण्यात आले होते. एडीबीने या प्रमुख रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामास तत्त्वतः मान्यताही दिली. रस्त्याचे सर्वेक्षण 1१२ सप्टेंबर २०१९ ला भोपाळ येथील आयकॉन इंजिनीअरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे दिले. कंपनीने सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले. त्याचा डीपीआरही बनवला. जवळपास साडे सहाशे कोटी त्यावर खर्च अपेक्षित होता. या रस्त्याचे काम सुरु होण्याच्या अंतिम टप्प्यात होते.

स्ता २०१५ पासून रखडला
या मार्गाचा प्रश्न २०१५ पासून रखडला आहे. २०१५ ला हा मार्ग दुपदरीकरणासह दर्जावाढ आणि राष्ट्रीय महामार्गबाबत प्रस्तावित केला गेला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून याबाबत सर्वेक्षण पूर्ण करून विकास आराखडा मंजूर केले गेले. बांधकाम विभागाच्या वरिष्ठांकडून या रस्त्यावर कुठलेही काम न घेण्याचे निर्देश अचलपूर बांधकाम विभागाला दिल्या गेले. पण, पुढे मांजर आडवी गेल्यामुळे हा रस्ता व प्रस्ताव मागे पडला. यानंतर सन २०१८ मध्ये हा रस्ता एशियन डेव्हलपमेंट बँकेकडे दिला गेला.  पण यातही मांजर आडवी गेली आणि  रस्त्याचे काम रखडले.

खड्डे कोण बुजविणार?
या मार्गावर परतवाडा ते पूर्णानगर दरम्यान लक्षवेधक गड्डे पडले आहेत. रस्ता कमी आणि खड्डेच अधिक आहेत. हा रस्ता मेंटेनन्सकरिता कंत्राटदाराकडे दिला आहे. पण, त्याने अजूनही रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवायला सुरुवात केलेली नाही.

रस्त्याचे आयुष्य संपले
अमरावती-परतवाडा हा आंतरराज्य महामार्ग ब्रिटिशकालीन आहे. त्याची अवस्था आज दयनीय झाली आहे. १८७५ ते १८८० च्या दरम्यान बांधल्या गेलेल्या या मार्गाचे आयुष्याच संपले आहे.

Web Title: Planning was hijacked by the construction minister on the hands of the Union transport minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.