वृक्षारोपणाचा खर्च लाखांत; जगली किती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:21 AM2018-01-23T00:21:38+5:302018-01-23T00:23:19+5:30

एकीकडे वृक्षतोडीचे प्रमाण वाढले असताना, दुसरीकडे कागदोपत्री वृक्षारोपण कार्यक्रम दाखविले जात आहे. विशेष म्हणजे, एका पाहणीत रोपलेली झाडे जगलीच नाही, असे दिसून आले आहे.

Planting cost of millions; How much is it? | वृक्षारोपणाचा खर्च लाखांत; जगली किती?

वृक्षारोपणाचा खर्च लाखांत; जगली किती?

Next
ठळक मुद्देनावापुरतेच ठरले वृक्षारोपणत्याच त्या खड्ड्यांचा उपयोग

आॅनलाईन लोकमत
अचलपूर : एकीकडे वृक्षतोडीचे प्रमाण वाढले असताना, दुसरीकडे कागदोपत्री वृक्षारोपण कार्यक्रम दाखविले जात आहे. विशेष म्हणजे, एका पाहणीत रोपलेली झाडे जगलीच नाही, असे दिसून आले आहे. यामुळे वृक्षारोपणावर केलेला लाखोंचा खर्च कुचकामी ठरल्याचे चित्र आहे. झाडे जगण्यासाठी अधिकाºयांनी पुढाकार घेणे गरजेचे असताना, याकडे मात्र कुणाचेही लक्ष नसल्याचे चित्र आहे.
शासन दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला कोट्यवधी रुपयांची झाडे लावते. पण, वृक्षारोपणापुरताच हा कार्यक्रम मर्यादित राहतो. लावलेल्या झाडांना योग्य संरक्षण मिळत नाही. त्यांची निगा राखली जात नाही. त्यामुळे शासकीय योजनेचा केवळ पैसा खर्च होतो. पर्यावरण संवर्धनाला त्याचा फायदा होत नसल्याचे चित्र तालुक्यात आहे. अचलपूर पंचायत समिती अंतर्गत ७० ग्रामपंचायतींमध्ये २०१६-१७ या वर्षात करण्यात आलेल्या वृक्षारोपणापैकी जिवंत असलेल्या रोपट्यांची संख्या नगण्य आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गंत त्यांना मजुरांकडून पाणी टाकले असल्याचे दाखविले जात होते. पण त्यातील नगण्य झाडे शिल्लक असल्याची माहीती आहे.
पाहणीसाठी समिती गठित
सन २०१५-१६ व १६-१७ या साली वृक्षलागवडीतील किती झाडे शिल्लक आहेत, शिल्लक असलेल्या झाडांची उंची किती, वृक्षांची आजची स्थिती, अशा अनेक मुद्द्यांवर अवलोकन करण्यासाठी तत्कालीन सहायक गटविकास अधिकारी वासुदेव कनाटे यांनी एका समितीचे गठण केले होते. यासंदर्भात एक तक्रार राहुल कडू यांनी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी यांना केली. यावरून समिती गठित झाली.
झाडे वाचविण्यासाठी ‘चिपको’ आंदोलन
२०१० ते २०१३ या कालावधीत अचलपूर-परतवाडा शहरात २८ हजार ६०० झाडे लावण्यात आली. यासाठी १० लाख ९० हजार रुपये खर्च झाला. ही झाडे आता नाहीत. एका महामंडळाने अंजनगाव स्टॉप ते बैतुल स्टॉपवरील ३५ झाडे तोडण्याची परवानगी मागितली आहे. ती झाडे तोडू नये, यासाठी आदिवासी पर्यावरण संघटनेच्या योगेश खानझोडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी चिपको आंदोलन केले.

नगरपरिषद अंतर्गत वृक्षारोपणाची चौकशी करू. अनियमितता असल्यास कारवाई होईलच. - सुनीता फिसके, नगराध्यक्ष, अचलपूर.

Web Title: Planting cost of millions; How much is it?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.