शहरात प्लास्टिक जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 06:00 AM2019-12-15T06:00:00+5:302019-12-15T06:00:42+5:30
शासनाने प्लास्टिक बंदी लागू केली असली तरी शहरातील अनेक व्यापारी प्रतिष्ठानांमध्ये तसेच चिल्लर विक्रत्यांकडे प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर सुरू असल्याचे दिसून येत आहे. हा सर्व गैरमार्गाने सुरू आहे. प्लॅस्टिक बंदी लागू झाल्यापासून अद्यापपर्यंत तरी शंभर टक्के बंदी झाल्याचे चित्र गैरमार्गाने होत असलेल्या वापरावरून स्पष्ट होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरातील झोन क्र. ५ भाजीबाजार अंतर्गत जवाहर गेट येथे १३ डिसेंबर रोजी महापालिका स्वच्छता विभाग व प्राधिकृत अधिकाऱ्यांकडून संयुक्तरीत्या प्लास्टिक जप्तीमोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत दोन ट्रक प्लास्टिक व नॉनओवन जप्त करण्यात आले तसेच दुकानदारांकडून १५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
महेश बजाज, हितेश दरानी, राजू धामेचा यांना प्रत्येकी ५००० असा एकूण १५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. महापालिकेचे आरोग्य अधीक्षक अरुण तिजारे, प्लास्टिकबंदीबाबत प्राधिकृत अधिकारी गणेश अनासाने, सुधीर तिवारी, प्रवीण शेंडे, ज्येष्ठ आरोग्य निरीक्षक राऊत, आरोग्य निरीक्षक व्ही.डी. जेधे, धनीराम कलोसे, ए.एम. सय्यद, मनीष नकवाल, जीवन राठोड, मोहित जाधव, पछेल, धर्मेंद्र डिके, अनूपकांत पाटणे, पोलीस पथकप्रमुख अतुल घारपांडे, राहुल थोरात, चंदा काबडे आदी उपस्थित होते. दरम्यान महापालिका प्रशासनाकडून प्लॉस्टिक जप्ती विरोधात मोहीम सुरू असून, ती प्रभाविपणे राबविण्याची गरज आहे.
गैर मार्गाने सर्रास वापर
शासनाने प्लास्टिक बंदी लागू केली असली तरी शहरातील अनेक व्यापारी प्रतिष्ठानांमध्ये तसेच चिल्लर विक्रत्यांकडे प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर सुरू असल्याचे दिसून येत आहे. हा सर्व गैरमार्गाने सुरू आहे. प्लॅस्टिक बंदी लागू झाल्यापासून अद्यापपर्यंत तरी शंभर टक्के बंदी झाल्याचे चित्र गैरमार्गाने होत असलेल्या वापरावरून स्पष्ट होते. अनेकदा भाजीविक्रेते व अन्य व्यवसायिकांकडे प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असल्याचे चित्र शहराच्या विविध भागांत दिसून येत आहे.