जिल्हा बँकेपुढे शिवसेनेचे ढोल वाजवा
By admin | Published: July 11, 2017 12:10 AM2017-07-11T00:10:42+5:302017-07-11T00:10:42+5:30
कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची यादी सरकारने जाहीर करावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने सोमवारी माजी ...
आंदोलन : कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची यादी सरकारने जाहीर करावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने सोमवारी माजी आमदार संजय बंड, राजेश वानखडे, प्रशांत वानखडे व शहराध्यक्ष सुनील खराटे आदींच्या नेतृत्वात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रवेशव्दारासमोर ढोल वाजवा आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या माध्यमातून शहरवासीयांचे लक्ष वेधले.
ढोल वाजवीत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बँकेच्या मुख्यालयापर्यंत प्रवेश केला. राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा करून जिल्हानिहाय आकडेवारी प्रसिध्द केली. मात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी अद्यापही जाहीर करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे शिवसेनेतर्फे प्रत्येक बँकेत शेतकऱ्यांची माहिती घेऊन किती जणांना कर्जमाफी मिळाली याची माहिती गोळा करणार आहे. याअनुषंगाने जिल्हा मध्यवती सहकारी बँकेसह सर्वच राष्ट्रीयकृ त बँकांनी कर्जमाफीस पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करावी व त्याची प्रत प्रत्येक शिवसेना शाखा प्रमुख ते जिल्हा प्रमुखांपर्यंतच्या पदाधिकाऱ्यांना द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय बंड यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने जिल्हा बँकेचे व्यवस्थापक जे.सी. राठोड यांना निवेदनाव्दारे केली. यावेळी बँकेचे संचालक प्रकाश काळबांडे उपस्थित होते. आंदोलनात नाना नागमोते, वर्षा भोयर, मनीषा टेंभरे, वैशाली राणे, ज्योती अवघड, शारदा पेंदाम, रेखा मोरे, शाम देशमुख, आशिष धर्माळे, प्रवीण अळसपुरे, अमोल निस्ताने, बाळासाहेब राणे, प्रमोद कोहळे, विकास शेळके, किशोर माहूरे, प्रवीण अब्रुक, प्रदीप गौरखेडे, नीलेश जामठे, बंडू साऊत, उमेश घुरडे, दीपक मदनेकर, स्वराज ठाकरे, राहुल माटोडे, पराग गुळधे व शिवर्सैनिक उपस्थित होते.