ढगाळ वातावरणाचा सुखद रविवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 10:58 PM2018-03-11T22:58:34+5:302018-03-11T22:58:34+5:30

उन्हाळा सुरू झाला, हळूहळू उन्हाची तीव्रता वाढू लागली, दरम्यान वादळी व विजेच्या गडगडाटात पाऊस पडला. रविवारी पुन्हा ढगाळ वातावरण निर्मित झाले.

A pleasant Sunday of cloudy atmosphere | ढगाळ वातावरणाचा सुखद रविवार

ढगाळ वातावरणाचा सुखद रविवार

Next
ठळक मुद्देदोन दिवसांनंतर तापमान वाढणार : १६ ते १८ पर्यंत दक्षिण विदर्भात पावसाची शक्यता

आॅनलाईन लोकमत
अमरावती : उन्हाळा सुरू झाला, हळूहळू उन्हाची तीव्रता वाढू लागली, दरम्यान वादळी व विजेच्या गडगडाटात पाऊस पडला. रविवारी पुन्हा ढगाळ वातावरण निर्मित झाले. सकाळपासून सुखद व आल्हाददायक वातावरण अमरावतीकरांनी अनुभवले. मात्र, आता पुढील दोन दिवसांनंतर उन्हाच्या झळा वाढणार असल्याचे संकेत असून, १६ ते १८ मार्चदरम्यान दक्षिण विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञाने वर्तविली आहे.
जेमतेम उन्हाळा सुरू झाला. मात्र, यावर्षी अल्प पावसामुळे नदी-नाले कोरडेच राहिले. त्यामुळे ओलिताचे प्रमाण नगण्यच. मार्चच्या पहिल्याच उन्हाचा कडाका जाणवायला लागला. तापमान ३८ डिग्रीपर्यंत पोहोचले होते. दरम्यान, अनेकांनी कूलर दुरुस्तीची तयारीही सुरू केली. मात्र, रविवारी झालेल्या ढगाळ वातावरणामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. मात्र, पुढील दिवसांत उन्हाळ्याच्या तीव्र झळा सहन करायला लागणार आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत दुपारच्या तापमानाच कमालीची वाढ जाणवणार आहे. पुढील तीन दिवसांतच तापमान दोन ते तीन डिग्रीने वाढणार असून सद्यस्थितीतील कमाल ३४ व किमान १९ डिग्री सेल्सिअसचे तापमान ३८ डिग्रीपर्यंत जाण्याची शक्यता श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाचे हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी वर्तविली आहे.
वातावरणातील बदलामुळे आजारात वाढ
ढगाळ वातावरण व तेवढीच बोचरी ऊन या वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला व व्हायरल इन्फेक्शनच्या रूग्णांमध्ये वाढ झाली असून, रूग्णांनी खासगी रूग्णालयासह खासगी दवाखान्याकडे धाव घेतली आहे. सर्दी, खोकला व ताप या आजाराने ग्रस्त जिल्हा सामान्य रूग्णालयात रोज ८० ते ९० रूग्णांची बाह्यरूग्ण तपासणी करण्यात येत आहे. प्रत्येक खासगी रूग्णालयातही अशा रूग्णांची मोठी गर्दी बघावयास मिळत आहे. त्यामुळे अशा वातावरणात नागरिकांनी प्रकृतीची खबरदारी घेण्याचा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे. मार्च महिन्याच्या सुरूवातीलाच उन्हाचा कडाका वाढला. पण चार दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. वादळी पाऊस व गारपिटीचा अंदाजही हवामान खात्याने वर्तविला होता. या ठिकाणी सर्दी होणे, ताप येणे पोट दुखणे, मळमळ असे अनेक आजार उद्भवत आहेत.
कमी दाबाचा पट्टा पश्चिमेकडे सरकणार
बंगालच्या उपसागरात श्रीलंकेजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. एक ते दोन दिवसांत पश्चिमकडे सरकणार आहे. त्यामुळे दक्षिण विदर्भात पाऊस पडू शकतो. पुसद, यवतमाळ, चंद्रपूर, बुलडाणा या पट्यात येत्या १६ ते १८ तारखेला पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज बंड यांनी वर्तविला आहे.
अमरावतीत पाऊस
अमरावती जिल्ह्यातील काही भागात शनिवारी रात्री पावसाचे आगमन झाले. रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरणाची निर्मिती झाली होती. जिल्ह्यातील तळेगाव दशासरमध्ये अवकाळी पाऊसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.

Web Title: A pleasant Sunday of cloudy atmosphere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.