शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 09:52 PM2018-06-05T21:52:26+5:302018-06-05T21:52:36+5:30

सरसकट कर्जमाफी व नवीन कर्जवाटप, ६० वर्षांवरील शेतकरी-शेतमजुरांना दोन हजार रुपये पेंशन तसेच नाफेडची खरेदी केंद्रे सुरू करण्याची मागणी जनता दल (सेक्युलर) च्यावतीने एसडीओंमार्फत मुख्यमंत्र्यांना सोमवारी पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. 

Please forgive the debt of the farmers | शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा

शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा

googlenewsNext
ठळक मुद्देजनता दलाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी : नाफेडची खरेदी पूर्ववत सुरू करा 

चांदूर रेल्वे : सरसकट कर्जमाफी व नवीन कर्जवाटप, ६० वर्षांवरील शेतकरी-शेतमजुरांना दोन हजार रुपये पेंशन तसेच नाफेडची खरेदी केंद्रे सुरू करण्याची मागणी जनता दल (सेक्युलर) च्यावतीने एसडीओंमार्फत मुख्यमंत्र्यांना सोमवारी पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. 
बंद केलेली हरभरा व तुरीची खरेदी पूर्ववत सुरू करावी व नाफेडने शेतकऱ्यांचे खरेदी केलेल्या हरभरा व तुरीचे पैसे तातडीने द्यावे, अशी मागणी जनता दलाच्यावतीने एसडीओंंमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. यावेळी गौरव सव्वालाखे, महमूद हुसेन, धर्मराज वरघट, दादाराव डोंगरे, साहेबराव शेळके, संजय डगवार, सुधीर सव्वालाखे, उत्तमराव पडोळे, अंबादास हरणे, अवधूत सोनवने, छाया झाडे, सुनीता भगत, रमेश गुल्हाने, शंकरराव आंबटकर, प्रकाश बन्सोड, अशोक हांडे, प्रमोद बिजवे, अशोक रोडगे, नंदू घोडेस्वार यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Please forgive the debt of the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.