ग्रामपंचायतींच्या सौर दिव्यांची दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 10:24 PM2017-12-27T22:24:58+5:302017-12-27T22:25:33+5:30
सौर पथदिवे हा ग्रामीण भागातील उत्तम पर्याय आहे. त्यातील बॅटरी १०-११ तास पुरेल इतकी ऊर्जा ठेवून सक्षम असते.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : सौर पथदिवे हा ग्रामीण भागातील उत्तम पर्याय आहे. त्यातील बॅटरी १०-११ तास पुरेल इतकी ऊर्जा ठेवून सक्षम असते. यात हे दिवे चालू, बंद करण्याची सुविधा स्वयंचलित आहेत. या दिव्याचे आयुष्य १५ ते २० वर्षे आहे. याच्यातील बॅटरीची देखभालीची आवश्यकता असते. याची किंमत सुमारे २५ हजाराच्या पुढे एका दिव्याची आहे. यांच्यामुळे दुसऱ्या विजेची गरज नाही. हे दिवे बसवण्यास सोपे असून पर्यावरण स्रेही आहेत. मात्र याची योग्य देखभाल न केल्याने अनेक ग्रामपंचायतींच्या सौर दिव्यांची दुर्दशेसाठी आहे.
रस्त्यावर बसवल्या जाणाऱ्या सौर दिव्यात फोटो व्होल्टिक तंत्रज्ञानाचा उपयोग असतो. या दिवसांत सूर्यप्रकाशापासून सौर ऊर्जा निर्माण होते व रात्री या विजेचा उपयोग होतो. याला शासनाचे अनुदान असते. या योजनेमार्फत ग्रामसभेच्या मान्यतेने हे दिवे बसवण्यात येतात. ग्रामपंचायतीने याची योग्य अंमलबजावणी केली असता याचा दीर्घकालीन उपयोग होऊ शकतो. काही भागातील बºयाच ग्रामपंचायतींनी सौर दिव्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. बऱ्याच गावांत या दिव्याचे सांगाडेच उभे आहेत. या दिव्याची योग्य देखभाल न केल्यामुळे बहुतांश सौरदिवे निकामी झाले आहेत. काही भुरट्या चोरांनी ते दिवे लंपास केले आहे. यामुळे चांगल्या योजनेचा फज्जा उडाला आहे.
विविध गावांतील योग्य ठिकाणी सौर दिवे जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतींना मोफत दिले आहेत. मात्र, बहुतांश ग्रामपंचायतींनी या दिव्याची योग्य देखभाल न केल्यामुळे हजारो रूपये किमतीचे हे दिवे बंद पडले आहेत. काही दिव्यांची चोरी झाली आहे. बॅटऱ्या खराब झाल्या आहेत. जिल्हा परिषदेने याबाबत युद्धपातळीवर योग्य त्या अधिकाऱ्यांनी गाववार चौकशीचा अहवाल घेण्यात यावेत व वसुली करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
यासंदर्भात ग्रापंचायतींची माहिती घेऊन बंद असलेले सौरदिवे पुन्हा सुरू करण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींना आवश्यक त्या सूचना देण्यात येतील.
- माया वानखडे,
डेप्युटी सीईओ, पंचायत