सहा नगरसेवक असलेल्या प्रभागाची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:07 AM2021-02-22T04:07:25+5:302021-02-22T04:07:25+5:30

धारणी : शहरातील सर्वांत सुशिक्षित प्रभाग म्हणून प्रभाग क्रमांक ३ चे नाव गणले जाते. मात्र, या प्रभागाची अवस्था सहा ...

The plight of a ward with six councilors | सहा नगरसेवक असलेल्या प्रभागाची दुर्दशा

सहा नगरसेवक असलेल्या प्रभागाची दुर्दशा

Next

धारणी : शहरातील सर्वांत सुशिक्षित प्रभाग म्हणून प्रभाग क्रमांक ३ चे नाव गणले जाते. मात्र, या प्रभागाची अवस्था सहा सदस्य असतानासुद्धा अत्यंत विदारक बनलेली आहे. या प्रभागातील नाल्या तुडुंब भरल्यानंतरसुद्धा एकही नगरसेवक तिकडे फिरकत नाही.

किड्स केअर स्कूल आणि शिक्षक बँकेकडे जाणा०या रस्त्याचे नालीत रूपांतरण झाले आहे. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागते. विशेष करून महिलांना दुचाकी चालवताना अधिक त्रास होतो. या प्रभागामध्ये दोन स्वीकृत सदस्यांसह चार मावळते सदस्य राहतात. इतकेच नव्हे तर या प्रभागात माजी सभापती आणि आमदारांचेसुद्धा निवासस्थान आहे. तरीसुद्धा या प्रभागाची दुर्दशा झाली आहे.

सध्या नगरपंचायत निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, प्रत्येक इच्छुकाने आपापल्या प्रभागात स्वखर्चाने नाल्यांची सफाई, रस्त्यांची दुरुस्ती आणि पथदिवे लावणे प्रारंभ केले आहे. परंतु, प्रभाग क्रमांक ३ ओबीसी महिलांसाठी राखीव असल्यामुळे इच्छुकांनी पाठ फिरविली आहे.

Web Title: The plight of a ward with six councilors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.