पीएम आवास योजनेचा फक्त बोलबालाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:09 AM2021-06-19T04:09:34+5:302021-06-19T04:09:34+5:30
अनंत बोबडे येवदा : दर्यापूर तालुक्यातील प्रधानमंत्री घरकुल आवास योजना बाबत दर्यापूर ग्रामीण भागातील बहुतांश लाभार्थांना आतापर्यंत तीन ...
अनंत बोबडे
येवदा : दर्यापूर तालुक्यातील प्रधानमंत्री घरकुल आवास योजना बाबत दर्यापूर ग्रामीण भागातील बहुतांश लाभार्थांना आतापर्यंत तीन हप्त्यांचे धनादेश मिळाले आहेत. काही लाभार्थी मात्र अजूनही घरकुल योजनेच्या पहिल्याच हप्त्यापासून वंचित आहेत. तसेच घरकुल योजना कामाचे मास्टरचे धनादेश मिळाले नसल्याने दर्यापूर तालुक्यातील लाभार्थींची घरकुल योजनेची कामे बंद आहेत. त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने दर्यापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बाळासाहेब रायबोले यांना निवेदन सादर करून तात्काळ लाभार्थांना घरकुलचे चेक व घरकुल कामाच्या मस्टरचे धनादेश तात्काळ देण्यात यावेत, याबाबत निवेदन सादर करण्यात आले. निवेदनाच्या अनुषंगाने पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बाळासाहेब रायबोले यांच्यासोबत चर्चा करताना लाभार्थांना घरकुल योजना व मस्टरचे चेक मिळण्याबाबत तांत्रिक अडचणी असल्याचे बैठकीत सांगण्यात आले त्यावर आक्षेप घेत प्रहारचे प्रदीप वडतकर व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तांत्रिक अडचणी तात्काळ सोडून लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा व मस्टरचे धनादेश तात्काळ देण्यात यावेत. अन्यथा आपल्या कार्यालयात तीव्र आंदोलनाचा इशारा गटविकास अधिकारी यांना प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रदीप वडतकर, शाखाप्रमुख आकाश घटाळे यांनी दिला. यावेळी चर्चा करताना प्रहारचे प्रदीप वडतकर, आकाश घटाळे, सोनू ठाकरे, मंगेश पांडे, साहिल कानाकिरल, शाम इंगळे, ऋषिकेश घटाळे, अनिकेत घटाळे , चेतन घटाळे , परशरम पवार, सचिन लोरे, शाम कात्रे, रुपेश येसणे, चक्रधर सोळंके, प्रणव लाखे, अंकुश गोटे, विजय काळे, सोमेश नवलकर, गजानन नवलकर, तेजस पतोंड, सचिन वानखेडे, गोकुल निवाने, महेश सूर्यवंशी, आकाश चव्हाण, गौरव बावनकुळे, शरद मोहोरकर, नितीन मोहोरकार, जरिफ, अस्लम, सुमित माहुलकर, गणेश कात्रे, गोपाल नवलकर, अनिल बावनकुळे उपस्थित होते.