फवारणी करताना शेतकऱ्याला विषबाधा; प्रकृती गंभीर 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2018 08:41 PM2018-07-24T20:41:38+5:302018-07-24T20:43:02+5:30

अमर देशमुख (वय - ४२) असे विषबाधा झालेल्या शेतकऱ्याचे नाव

Poisoning to the farmer during spraying; Health is serious | फवारणी करताना शेतकऱ्याला विषबाधा; प्रकृती गंभीर 

फवारणी करताना शेतकऱ्याला विषबाधा; प्रकृती गंभीर 

Next

अमरावती - शेतात तणनाशकाची फवारणी करताना विषबाधा झाल्याने धामणगाव तालुक्यातील एका शेतकऱ्याची  प्रकृती गंभीर झाली आहे. अमर देशमुख (वय - ४२) असे विषबाधा झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. धामणगाव तालुक्यातील वरुड बगाजी येथील रहिवासी आलेल्या देशमुख यांनी  त्यांच्या शेतात पेरलेल्या सोयाबीन व कपाशी पिकावर तणनाशक औषधांची फवारणी केली. दरम्यान, दुपारी मळमळ होत असल्याने ते घराकडे परतले. मात्र, त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मागील वर्षी यवतमाळ जिल्ह्यात फवारणीमुळे अनेक शेतकऱ्यांचे मृत्यू झाले आहेत. 

Web Title: Poisoning to the farmer during spraying; Health is serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.