‘पोकरा’चा प्रलंबित निधी दोन आठवड्यात उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 05:00 AM2020-05-20T05:00:00+5:302020-05-20T05:01:26+5:30

पोकरा अंतर्गत जिल्ह्यातील ९१९ लाभार्थी शेतकरी बांधवांचे अनुदान प्रलंबित आहे. यासाठी पालकमंत्र्यांनी यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व कृषी मंत्री यांच्याकडे सात्याने पाठपुरावा केला. या योजनेत जिल्ह्यातील निवडक गावांतील लाभार्थी शेतकऱ्यांमार्फत राबविण्यात आलेल्या उपक्रमाची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेली नाही. सध्या लॉकडाऊनची परिस्थिती पाहता शेतकरी हा आर्थिक अडचणीत आलेला आहे.

Pokra's pending funds are available in two weeks | ‘पोकरा’चा प्रलंबित निधी दोन आठवड्यात उपलब्ध

‘पोकरा’चा प्रलंबित निधी दोन आठवड्यात उपलब्ध

Next
ठळक मुद्देपालकमंत्री : ९१९ शेतकरी लाभार्थींच्या बँक खात्यात होणार जमा

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत काही लाभार्थींच्या अनुदानासाठी शासनाने १.६२ कोटींची तरतूद केलेली आहे. शासनाकडे पाठपुरावा केल्याने ९१९ शेतकरी लाभार्थींच्या बँक खात्यात ही रक्कम जमा केली जाणार असल्याचे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितले.
पोकरा अंतर्गत जिल्ह्यातील ९१९ लाभार्थी शेतकरी बांधवांचे अनुदान प्रलंबित आहे. यासाठी पालकमंत्र्यांनी यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व कृषी मंत्री यांच्याकडे सात्याने पाठपुरावा केला. या योजनेत जिल्ह्यातील निवडक गावांतील लाभार्थी शेतकऱ्यांमार्फत राबविण्यात आलेल्या उपक्रमाची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेली नाही. सध्या लॉकडाऊनची परिस्थिती पाहता शेतकरी हा आर्थिक अडचणीत आलेला आहे.
पुढे खरीप हंगाम सुरू होत असल्यामुळे पात्र लाभार्थींच्या अनुदानाची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा होणे आवश्यक आहे, असे पालकमंत्र्यांनी कृषिमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
जिल्ह्यात पोकरा अंतर्गत ठिबक सिंचन, पीव्हीसी पाइप, फळबाग लागवड, बीजोत्पादन कार्यक्रम, शेळीपालन, तुषार सिंचन, विद्युत पंप, रेशीम लागवड आदी कामे करणाºया ९१९ लाभार्थींचा निधी प्रलंबित होता. याबाबत कृषी, विभागाने आता शासन निर्णय जारी केला.
त्यानुसार तरतूद झाल्यामुळे जिल्ह्यात निधी प्राप्त होऊन संबंधित शेतकऱ्यांना खरीप हंगामात उद्भवत असलेल्या अडचण दूर होणार आहेत.

५३२ गावांमध्ये प्रकल्पातंर्गत योजना
जिल्ह्यात ५३२ गावांमध्ये नानाजी देशमुख प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून सदर गावांमध्ये हवामान बदलास अनुकूल शेतीपद्धती विकसित करण्याच्या हेतूने सदर गावांमध्ये टप्प्याटप्प्याने प्रकल्प राबविण्यात येत आहे. गावांचे सूक्ष्म नियोजन, आराखडे तयार करून प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झाल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी सांगीतले. दीर्घकालीन उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून योजना अधिक प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहे.

Web Title: Pokra's pending funds are available in two weeks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.