दसऱ्याच्या पाश्वभूमिवर बनावट पनीर जप्त, अमरावतीत पोलिसांची कारवाई
By प्रदीप भाकरे | Published: October 4, 2022 05:14 PM2022-10-04T17:14:12+5:302022-10-04T17:15:59+5:30
संबंधित घटेची माहिती अन्न सुरक्षा विभागाला देण्यात आली आहे. सहायक पोलीस निरिक्षक योगेश इंगळे यांच्या नेतृत्वाखालील एका विशेष पथकाने ही कारवाई केली.
अमरावती- पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्या विशेष पथकाने मंगळवारी (४ ऑक्टोबर रोजी) सुमारे २८ हजार ५६० रुपये किमतीचे पनीर जप्त केले आहे. फ्रेजरपुरा हद्दीतील महादेव खोरी पुलाखाली ही कारवाई करण्यात आली.
अतुल अरुणराव राऊत (२८, रा. सातुर्णा अमरावती) हा एका ऑटोतून पनीर नेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर, ऑटोची झडती घेण्यात आली. या ऑटोमध्ये तब्बल १२० किलो ग्रॅम पनीर आढळून आले. ते पनीर बनावट असल्याचा संशय असल्याने त्यास मालासह ताब्यात घेण्यात आले आहे.
संबंधित घटेची माहिती अन्न सुरक्षा विभागाला देण्यात आली आहे. सहायक पोलीस निरिक्षक योगेश इंगळे यांच्या नेतृत्वाखालील एका विशेष पथकाने ही कारवाई केली.