महिला, विद्यार्थिनीच्या संरक्षणासाठी पोलीस सजग

By admin | Published: February 22, 2016 12:48 AM2016-02-22T00:48:27+5:302016-02-22T00:48:27+5:30

महिला व विद्यार्थिनींच्या संरक्षणासाठी असणाऱ्या कायद्याची अंमलबजावणी सक्तीने करून सार्वजनिक ठिकाणी महिलांना सुरक्षा देण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज राहतील, ....

Police alert for women, girl students | महिला, विद्यार्थिनीच्या संरक्षणासाठी पोलीस सजग

महिला, विद्यार्थिनीच्या संरक्षणासाठी पोलीस सजग

Next

सीपी दत्तात्रय मंडलिक यांची ग्वाही : कायदा व स्वसंरक्षणार्थ शिबिर
अमरावती : महिला व विद्यार्थिनींच्या संरक्षणासाठी असणाऱ्या कायद्याची अंमलबजावणी सक्तीने करून सार्वजनिक ठिकाणी महिलांना सुरक्षा देण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज राहतील, अशी ग्वाही पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी दिली. मात्र, महिलांनी अत्याचारविरुध्द लढा देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.
शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेचा महिला संघ व पोलीस आयुक्तालयात यांच्या संयुक्त विद्यमाने १८ फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या कायदा व स्वसंरक्षणार्थ मार्गदर्शन शिबिरात उद्घाटक म्हणून पोलीस आयुक्त बोलत होते. शिक्षणात सातत्याने वाढणारे विद्यार्थिनींचे प्रमाण हे देशाच्या सामाजिक उन्नतीचे प्रतीक आहे. महाविद्यालये, शाळा व शैक्षणिक परिसरात असणारी महिलांची संख्या ही तुलनेने इतर क्षेत्रापेक्षा बरीच अधिक आहे. त्यामुळे त्या ठिकाणी महिलांसोबत अत्याचार व अपराधांची संभावनादेखील असते. त्यासाठी शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थ्यांनी दक्ष राहण्याची आवश्यकता आहे. असे मंडलिक म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे, संचालन वैशाली देशमुख तर आभार अंजली देशमुख यांनी मानले. यावेळी सहायक पोलीस आयुक्त चेतना तिडके, नीलिमा आरज यांच्यासह महिला संघाचे पदाधिकारी, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Police alert for women, girl students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.