धारणी मार्गावर अपघात, अमरावती येथील पोलीस ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:11 AM2021-06-04T04:11:34+5:302021-06-04T04:11:34+5:30

परतवाडा: परतवाडा ते धारणी मार्गावरील गौरखेडा कुंभी नर्सरी हनुमान मंदिराजवळ गुरुवारी रात्री ८ वाजता अज्ञात वाहनाने दुचाकीस्वाराला चिरडले. ...

Police in Amravati killed in road mishap | धारणी मार्गावर अपघात, अमरावती येथील पोलीस ठार

धारणी मार्गावर अपघात, अमरावती येथील पोलीस ठार

Next

परतवाडा: परतवाडा ते धारणी मार्गावरील गौरखेडा कुंभी नर्सरी हनुमान मंदिराजवळ गुरुवारी रात्री ८ वाजता अज्ञात वाहनाने दुचाकीस्वाराला चिरडले. मृतक अमरावती शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी असल्याची माहिती आहे.

रवींद्र महादेव कोर्कडे (३३) शहर वाहतूक शाखा अमरावती) असे मृत पोलिस शिपायाचे नाव आहे. ते चांदुर रेल्वे तालुक्यातील मूळ रहिवासी असल्याची माहिती आहे. ते दोन मित्रांसह दुचाकीने धारणीकडे गेले होते. परत येत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत रवींद्र यांचा मृत्यू झाला. गौरखेडा कुंभी ग्रामपंचायतीचे सदस्य अंकुश बिडकर, गणेश सोनवणे, अभिषेक वानखडे, मनोज बेलकर व गावकऱ्यांनी तत्काळ परतवाडा पोलिसांना माहिती दिली. परतवाडाचे ठाणेदार सदानंद मानकर व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अपघाताची माहिती मिळताच परतवाडा पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदी केली असून वृत्त लिहिस्तोवर पोलिसांची तपास मोहीम सुरू होती.

Web Title: Police in Amravati killed in road mishap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.