पोलीस आयुक्तांची एकाच रात्री ३५ किमी गस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 11:34 PM2017-11-01T23:34:19+5:302017-11-01T23:34:46+5:30

घरफोडीच्या घटनांमुळे भयभीत झालेल्या अमरावतीकरांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने वरिष्ठ पोलीस अधिकारीही रात्रकालीन गस्त घालत आहेत.

Police commissioner patrol 35km in the same night | पोलीस आयुक्तांची एकाच रात्री ३५ किमी गस्त

पोलीस आयुक्तांची एकाच रात्री ३५ किमी गस्त

Next
ठळक मुद्देघरफोडीवर उपाय : नागरिकांमध्ये सुरक्षिततेच्या भावनेसाठी प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : घरफोडीच्या घटनांमुळे भयभीत झालेल्या अमरावतीकरांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने वरिष्ठ पोलीस अधिकारीही रात्रकालीन गस्त घालत आहेत. खुद्द पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी मंगळवारची रात्र ते बुधवारी पहाटे ४ वाजेपर्यंत 'नॉनस्टॉप नाइट राऊन्ड' लावला. त्यांनी शहर हद्दीत तब्बल ३५ किलोमीटर रात्रकालीन गस्त घातली.
महिलांसह लहान मुलांची टोळी शहरात दाखल झाल्याच्या अफवेने अमरावतीकर नागरिक भयभीत झाले आहेत. ही अफवा असल्याचे पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी स्पष्ट केले असले तरी अशा अफवांचे पेवच फुटले आहे. त्यातच शहरात घडलेल्या घरफोडीच्या घटनांमुळे पोलिसांचीही झोप उडाली आहे. त्यावर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा संपूर्ण ताकदीने रस्त्यावर उतरली असून, त्यामध्ये वरिष्ठ अधिकाºयांनीही सहभाग घेतला आहे.
पोलीस आयुक्तांनी मंगळवारी रात्री ८ वाजता शहर हद्दीत गस्तीला सुरुवात केली. पंचवटी, वेलकम पॉइंट, बियाणी चौक, दस्तुरनगर मार्गे फेरफटका मारून सुरक्षेसंबंधी आढावा त्यांनी घेतला. रात्री ११ वाजता बे्रक घेतल्यानंतर पुन्हा रात्री १२ पासून नाइट राऊन्डला सुरुवात झाली. यानंतर गाडगेनगर, फे्रजरपुरा, खोलापुरी गेट, राजापेठ, बडनेरा ठाण्याच्या हद्दीतील मुख्य मार्गासह गल्लीबोळाचा फेरफटका केला. सीपींनी शहरात फिरून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचे प्रयत्न चालविले होते.

संशयितांची चौकशी
घरफोडीच्या घटनांच्या अनुषंगाने पोलीस आयुक्तांनी पथके सज्ज केली असून, ती आरोपींचा शोध घेत आहेत. ग्रिल काढून चोरी करणारे, नकली सोन्याचे जाणकार असणारे गुन्हेगार, हॉलचे ग्रिल तोडून बेडरूमच्या दारांची कडी लावून चोरी करणारे गुन्हेगार अशा तिन्ही पद्धतीने घरफोडी करणाºया गुन्हेगारांची यादी पोलिसांनी तयार केली आहे. त्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस यंत्रणा जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर तपासकामी पाठविण्यात आले आहे.

Web Title: Police commissioner patrol 35km in the same night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.