युवकाविरोधात पोलिसात तक्रार
By admin | Published: April 12, 2015 12:26 AM2015-04-12T00:26:50+5:302015-04-12T00:26:50+5:30
गहाण खताचे शासकीय नियमाप्रमाणे शुल्क न घेता आगाऊ पैशांची मागणी करणाऱ्या दुय्यम निबंधकाला विरोध करणाऱ्या ..
तो विचारतो जाब : भ्रष्टाचाराविरूद्ध केला होता आवाज बुलंद
अमरावती : गहाण खताचे शासकीय नियमाप्रमाणे शुल्क न घेता आगाऊ पैशांची मागणी करणाऱ्या दुय्यम निबंधकाला विरोध करणाऱ्या सुशिक्षित युवकाविरुध्द पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी त्याला अटक केलेली नाही. सहायक दुय्यम निबंधक कार्यालय मागील दोन महिन्यांपूर्वी तहसील कार्यालय परिसरात मूळ जागेत आणण्यात आले असले तरी दलालांच्या कचाट्यातून याची मुक्तता झालेली नाही. हे कार्यालय भ्रष्टाचाराचा अड्डा झालेला असून देव-घेव केल्याशिवाय येथे खरेदी विक्रीचे काम होत नाही. या कार्यालयाच्या गोविंद अमरचंद चरपटे या युवकाचे झेरॉक्स दुकान आहे. पैसे जादा होत असल्याची कुणी तक्रार घेऊन आल्यास चरपटे कार्यालयात जाऊन जाब विचारत असतो. त्यामुळे दलाल, सहाय्यक दुय्यम निबंधकाला तो अडथळा वाटत असे. शुक्रवारी शंकर विश्वनाथ ठाकरे (ईसेगाव) यांच्या शेताचे गहाण खताचे कामाचे ३२० रुपयात झाले असताना दुय्यम निबंधकाने ६०० रुपये मागितले. ठाकरे हे चरपटे यांच्या दुकानात गेले व घडलेली हकिकत सांगितली. चरपटे यांनी दुय्यम निबंधकाला याचा जाब विचारला. त्यांनी चरपटे यांना हाकलून लावले. त्याचेविरुध्द दलाल व दुय्यम निबंधक अर्जुन जगन्नाथ बरडे यांनी अचलपूर ठाण्यात तक्रार केली.