पोलिसांनी सुरक्षित पोहोचविले, पुन्हा परागंदा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:15 AM2021-08-23T04:15:37+5:302021-08-23T04:15:37+5:30

पान १ अमरावती : प्रेमसंबंधातून पळून गेलेल्या मुलीला पोलिसांनी सुरक्षित पोहोचवून दिले. मात्र, ती लगेचच, कुणालाही न सांगता पुन्हा ...

Police delivered safely, pollinated again! | पोलिसांनी सुरक्षित पोहोचविले, पुन्हा परागंदा !

पोलिसांनी सुरक्षित पोहोचविले, पुन्हा परागंदा !

Next

पान १

अमरावती : प्रेमसंबंधातून पळून गेलेल्या मुलीला पोलिसांनी सुरक्षित पोहोचवून दिले. मात्र, ती लगेचच, कुणालाही न सांगता पुन्हा परागंदा झाली. राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत २० ऑगस्ट रोजी रात्री ११ च्या सुमारास हा प्रकार उघड झाला. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी एका महिलेच्या तक्रारीवरून अज्ञाताविरूद्ध भादंविचे कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल केला.

तक्रारीनुसार, त्या मुलीचे गोपालनगर भागातील एका मुलाशी प्रेमसंबंध आहे. ती यापूर्वीदेखील पाच ते सहा वेळा त्याच्यासोबत निघून गेली होती. पुन्हा घरी परतली. एक दीड महिन्यापूर्वीही ती घरी कुणालाही न सांगता निघून गेली होती. ज्या इसमाकडे ती गेली होती, त्याने २० ऑगस्ट रोजी रात्री ११ च्या सुमारास तिला घरी आणून सोडले. त्यावेळी तिची आई, बहीण, महिला पोलिसांसह तीन पोलीस कर्मचारीदेखील सोबत होते. तिला तिच्या कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आले. त्यानंतर पालक तिला आवाज देण्याकरिता गेले असता, ती घरी आढळून आली नाही. आजूबाजूला व नातेवाईकांकडे शोध घेण्यात आला. मात्र, ती आढळून आली नाही. सबब, २१ ऑगस्ट रोजी दुपारी तक्रार नोंदविण्यात आली. तिला कुणीतरी अज्ञाताने फूस लावून पळवून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. राजापेठ पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरिक्षक जाकीर हे पुढील तपास करीत आहे.

Web Title: Police delivered safely, pollinated again!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.