तणनाशक फवारणीप्रकरणी पोलीस पाटलावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:17 AM2021-08-25T04:17:09+5:302021-08-25T04:17:09+5:30

पोलीस सूत्रांनुसार, चुकीच्या पद्धतीने तणनाशयक फवारणी केल्यामुळे आजूबाजूच्या शेतातील ४० एकर शेती बाधित होऊन तूर व कपाशी करपली आहे. ...

Police file case against Patla for spraying herbicides | तणनाशक फवारणीप्रकरणी पोलीस पाटलावर गुन्हा दाखल

तणनाशक फवारणीप्रकरणी पोलीस पाटलावर गुन्हा दाखल

googlenewsNext

पोलीस सूत्रांनुसार, चुकीच्या पद्धतीने तणनाशयक फवारणी केल्यामुळे आजूबाजूच्या शेतातील ४० एकर शेती बाधित होऊन तूर व कपाशी करपली आहे. यात १९ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. याप्रकरणी कृषी अधिकारी व कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांनी पाहणी दौरा करून अहवाल तयार केला. त्यात फवारणीमुळे पिकांचे नुकसान झाल्याचे निष्पन्न झाले. तो अहवाल पोलीस ठाण्यात सदर केल्यानंतर दोषी असलेले पवन देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.

पवन देशमुख यांनी त्यांच्या मौजा खुशाल मध्ये असलेल्या शेतात ज्वारीच्या पिकात ‘टू फोर डी’ हे अतिशय जहाल तणनाशक फवारले होते. त्यामुळे १९ शेतकऱ्यांच्या ४० एकर शेतातील तूर व कपाशी पिकांचे नुकसान झाले. यासंदर्भात मौसराज दांडगे, नितीन अकोलकरसह इतर शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी, पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. अहवालात त्यांनी १४ लाख ९ हजार ५०० रुपयांचे आर्थिक नुकसान केल्याचे नमूद करण्यात आले आहे. अहवाल पोलीस ठाण्याला मिळाल्यानंतर शिरजगाव पोलिसांनी पंचनामा केला व अखेर सोमवारी भादंविचे कलम २८४, ३३६, ४२७, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.

Web Title: Police file case against Patla for spraying herbicides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.