समारंभात तोंडी तलाक, पोलिसांनी केला गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2020 10:51 PM2020-02-15T22:51:48+5:302020-02-15T22:52:02+5:30

तलाक, तलाक, तलाक असे तीन वेळा उच्चारून पतीने तलाक दिल्याची तक्रार अमरावती पोलिसांना प्राप्त झाली. पोलिसांनी मुस्लिम महिलांसाठीच्या तलाकविरोधी कायद्यासह इतर कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. 

police file a crime against triple talaq | समारंभात तोंडी तलाक, पोलिसांनी केला गुन्हा दाखल 

समारंभात तोंडी तलाक, पोलिसांनी केला गुन्हा दाखल 

Next

अमरावती : तलाक, तलाक, तलाक असे तीन वेळा उच्चारून पतीने तलाक दिल्याची तक्रार अमरावती पोलिसांना प्राप्त झाली. पोलिसांनी मुस्लिम महिलांसाठीच्या तलाकविरोधी कायद्यासह इतर कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. 
पोलिसांनुसार, तक्रारकर्त्या महिलेचा विवाह अब्दुल मजहर अब्दुल जफर यांच्याशी झाला. १० फेब्रुवारी रोजी एका कार्यक्रमात तक्रारकर्ती महिला आणि नातेवाईक उपस्थित होते. तेथे पतीदेखील पोहोचला. काही कारणावरून त्याने पत्नीसोबत वाद घालून पत्नी, मुले आणि नातेवाइकांना मारहाण केली. तेथेच तीन वेळा तलाक असे उच्चारून त्याने तोंडी घटस्फोट दिला. अब्दुल मजहर अब्दुल जफर हा नेहमीच पैशांसाठी तगादा लावायचा. पैसे न दिल्यास पती छळ करायचा, असेही तक्रारकर्त्या महिलेने तक्रारीत नमूद केले आहे. पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या ४९८ (अ), ३२३ आणि ३४ तसेच मुस्लिम महिला प्रोटेक्शन आॅफ राइट आॅन मॅरेज कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले.

Web Title: police file a crime against triple talaq

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.