मुस्कान अभियानात पोलिसांनी शोधली १८ मुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:11 AM2020-12-26T04:11:41+5:302020-12-26T04:11:41+5:30
अमरावती : हरविलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांच्या आई-वडिलांना स्वाधीन करण्याकरिता पोलिसांच्यावतीने १ ते ३१ डिसेंबर दरम्यान मुस्कान अभियान ...
अमरावती : हरविलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांच्या आई-वडिलांना स्वाधीन करण्याकरिता पोलिसांच्यावतीने १ ते ३१ डिसेंबर दरम्यान मुस्कान अभियान -९ राबविण्यात येत आहे. याअंतर्गत पहिल्या पंधरवड्यात पोलिसांनी १८ मुलांचा शोध घेतला. यापैकी ११ मुलांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. सात मुलांना बालकल्याण समितीकडे पाठविण्यात आले. मुस्कान अभियानात शोध लावलेल्या १८ मुलांमध्ये सहा मुले, तर १२ मुलींचा समावेश आहे. ही मुले हरविल्यानंतर रस्त्यावर भीक मागून किंवा कुणाच्याही साह्याने जीवन जगल्याचे पोलिसांनी सांगितले. आपली मुले परत मिळाल्याबदल पालकांच्या चेहऱ्यावरील हास्य फुल्ले. काही मुले पारधी समाजाचीदेखील असल्याचे निष्पन्न झाले.
बॉक्स
जानेवारी ते नोव्हेंबरपर्यंत दाखल तक्रारी
महिना दाखल तक्रारी सापडलेली मुले
जानेवारी ११ १०
फेब्रुवारी ९ ९
मार्च ५ ४
एप्रिल २ २
मे २ १
जून ६ ६
जुलै ५ ५
ऑगस्ट ५ ४
सप्टेंबर ६ ६
ऑक्टोबर १० ८
नोव्हे्बर १२ ३
एकूण ७३ ५८
स्टोरी १) मतिमंद मुलांचा शोध
गाडगेनगर ठाणे हद्दीतील एक १६ वर्षीय मतीमंद मुलगा हरविला गेला होता त्याच्या पालकांनी पोलिसांकडे हरविल्याची तक्रार नोंदविली होती. पोलिसानी यशस्वी शोध घेवून त्याला एकाच दिवसात शोधून पालकांच्या स्वाधीन केले.
२) पळून गेलेल्या मुलीचा शोध
प्रेम प्रकरणातून प्रियकरासोबत पळून गेलेल्या एका १६ वर्षीय मुलीला पोलिसानी इंदोर येथून शोधून आणले. तिच्या पालकाने अपहरण झाल्याचा गुन्हा नोंदविला होता. याप्रकरणी पोलिसांनी खामगावच्या युवकालाही ताब्यात घेतले आहे.
३)स्टोरी
भीक मागणारे सात जण सापडले
घरातून निघून गेले. मात्र आई-वडिलांनी शोधल्यानंतरही मिळाले नाही. अशा मुलांवर सिग्नलवर भीक मागून पोट भरण्याची वेळ आली. यात ५ ते १२ वर्षांच्या बालकांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांना बालकल्याण समितीच्या स्वाधीन केले आहे. त्यांच्या पालकांचा शोध पोलीस घेत आहे.
कोट
मुस्कान अभियान एक महत्त्वाचे अभियान आहे. याकरिता पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे. सर्वांनी हिरीरीने हे अभियान राबविण्याकरिता प्रयत्न केले पाहिजे. त्यासंदर्भाचे आदेश देण्यात आले आहे. त्याकरिता विशेष पथकही तयार केले आहे.
- आरती सिंह, पोलीस आयुक्त अमरावती