पोलीस विश्रामगृहाच्या उद्घाटनात आमदाराला डावलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:10 AM2021-06-28T04:10:34+5:302021-06-28T04:10:34+5:30
चिखलदरा : जिल्हा ग्रामीण पोलीस दलातर्फे येथील हरिकेन पॉइंटवर उभारलेल्या विश्रामगृहाचे रविवारी उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला आपल्याला ...
चिखलदरा : जिल्हा ग्रामीण पोलीस दलातर्फे येथील हरिकेन पॉइंटवर उभारलेल्या विश्रामगृहाचे रविवारी उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला आपल्याला डावलल्याचा आरोप स्थानिक आमदार राजकुमार पटेल यांनी केला असून, ते याप्रकरणी विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव दाखल करणार आहे.
या नव्या पोलीस विश्रामगृहाचे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रम आयोजित करणाऱ्या संबंधित विभागाने प्रोटोकॉलनुसार स्थानिक आमदाराला निमंत्रित करणे गरजेचे होते. परंतु, आपणास कुठल्याच प्रकारे निमंत्रित करण्यात आले नाही. त्यामुळे आदिवासी आमदाराला हेतूपुरस्सर डावलण्यात आले. त्याबाबत हक्कभंग प्रस्ताव विधानसभेत दाखल करणार आहोत, असे आमदार पटेल यांनी स्पष्ट केले.
कोट
सार्वजनिक बांधकाम विभागाने वर्षभरापूर्वी पोलीस विश्रामगृहाचे बांधकाम करून दिले. मात्र, उद्घाटन समारंभाचे आयोजन आमचेकडून करण्यात आलेले नाही.
- चंद्रकांत मेहत्रे, कार्यकारी अभियंता
सा. बां. विभाग अचलपूर
एसपीचा कोट यायचा आहे.