कोरोनाकाळात पोलिसांची वसुली; चार कर्मचारी जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:27 AM2021-09-02T04:27:21+5:302021-09-02T04:27:21+5:30
असाईनमेंट अमरावती : कोरोनाकाळात सामान्यांसह नोकरदार वर्गही हतबल झाला असताना, पोलीस वर्तुळातील लाचखोरी थांबलेली नाही. ज्यांच्यावर समाजाच्या रक्षणाची जबाबदारी ...
असाईनमेंट
अमरावती : कोरोनाकाळात सामान्यांसह नोकरदार वर्गही हतबल झाला असताना, पोलीस वर्तुळातील लाचखोरी थांबलेली नाही. ज्यांच्यावर समाजाच्या रक्षणाची जबाबदारी आहे, तेच लाचखोरीत सापडले आहेत. लाचखोरीत महसूल पाठोपाठ पोलीस विभागाने आपला दुसरा क्रमांक कायम ठेवला आहे.
अमरावती जिल्ह्यात जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत चार पोलीस कर्मचारी लाच घेताना, ती स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अलगद अडकले. दाखल गुन्हयात अटक न करण्यासाठी देखील लाच स्वीकारली गेली. चोरीतील गुन्ह्यातून नाव काढण्यासाठीदेखील नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्यातील पोलीस शिपायाने ५ हजार रुपये लाच स्वीकारली.
///////////
या वर्षभरात झालेली कारवाई
जानेवारी : ०
फेब्रुवारी : ०
मार्च : १
एप्रिल : २
मे : १
जून : ०
जुलै : ०
/////////
पाच हजारांपासून ९० हजारांपर्यंत लाच
पोलीस शिपायाला अटक
नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्यातील शिपायाला १० मार्च रोजी ५ हजार रुपये लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. तक्रारकर्त्याच्या वडिलांविरूद्ध दाखल चोरीच्या गुन्ह्यात तक्रारकर्त्याचे नाव असल्याचे सांगून त्या गुन्ह्यातून नाव काढण्यासाठी ती लाच स्वीकारण्यात आली.
//////////
३ हजार घेताना दोघे अडकले
नांंदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस नाईक व एका पोलीस शिपायास दोघांना ३ हजार रुपये स्वीकारण्याच्या एकाच प्रकरणात एसीबीने ताब्यात घेतले. दाखल गुन्ह्यात अटक न करण्यासाठी ती लाच स्वीकारण्यात आली.
///////////
हवालदाराने मागितले ९० हजार
गाडगेनगर पोलीस ठाण्यात कार्यरत एका पोलीस हवालदाराने ९० हजार रुपयांची लाच मागितल्याचे पडताळणीदरम्यान निष्पन्न झाले होते. चोरीच्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी ती लाच मागण्यात आली होती. १९ मे रोजी हा ट्रॅप यशस्वी करण्यात आला होता.
/////////////
लाच मागितली जात असेल, तर येथे करा संपर्क
१) लाच मागितली जात असेल, तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या स्थानिक कॅप स्थित कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन एसीबीचे अधीक्षक विशाल गायकवाड यांनी केले आहे.
////////
२) लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ललित सेंटर, परांजपे काॅलनी, जिल्हाधिकारी कार्यालयामागे, अमरावती, दुरध्वनी क्रमांक ०७२१/२५५३०५५