पोलीस भरतीवर खुफियांची नजर
By admin | Published: June 7, 2014 11:40 PM2014-06-07T23:40:44+5:302014-06-07T23:40:44+5:30
जिल्ह्यात सध्या पोलीस भरती सुरु आहे. पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान नोकरी लावून देण्याचे सांगून फसवणुकीच्या घटना घडू शकतात. ही शक्यता लक्षात घेता पोलिसांचा खुफिया विभाग व लाचलुचपत प्रतिबंधक
पारदश्रीसाठी पाऊल : आर्थिक व्यवहारावरही लक्ष
अमरावती : जिल्ह्यात सध्या पोलीस भरती सुरु आहे. पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान नोकरी लावून देण्याचे सांगून फसवणुकीच्या घटना घडू शकतात. ही शक्यता लक्षात घेता पोलिसांचा खुफिया विभाग व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आर्थिक व्यवहारावर लक्ष ठेवून आहेत.
पोलीस भरती पारदश्री असावी, यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नरत असल्याचे दिसून येते. पोलीस भरतीच्या वेळी गैरप्रकार टाळण्यासाठी व गोरगरीब उमेदवारांचे नुकसान टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने पाऊल उचलले आहे. भरतीत तैनात पोलीस कर्मचार्यावर अधिक भरोसा ठेवून उमेदवार गंडविला जाण्याची शक्यता अधिक असल्याने ही खबरदारी म्हणून खुफिया नजर ठेवून आहेत.
नातेवाईक पोलिसांना वगळले
पोलीस भरतीत सहभागी उमेदवारांचे नातेवाईक असणार्या पोलीस कर्मचार्यांना भरती प्रक्रियेतून वगळण्यात आले आहे. पोलीस कर्मचार्यांचे बहुतांश नातेवाईक पोलीस भरतीत उमेदवार आहेत. अशा वेळी भरतीत तैनात कर्मचार्यांचा उमेदवारांना लाभ होऊ शकतो. वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी यासंदर्भात कर्मचार्यांची माहिती गोळा केली होती. ज्यांनी उमेदवार नातेवाईक असल्याची माहिती लपविली व नंतर त्याचा उलगडा झाल्यास अशा कर्मचार्यांवर कारवाईची टांगती तलवार राहणार आहे.
एसीबीची पाळत
पोलीस भरती प्रक्रियेत आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता लक्षात घेता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग विशेष पाळत ठेवून आहे. या विभागाने आर्थिक व्यवहारावर पाळत ठेवण्यासाठी गट तयार केले असून दरदिवसाला यासंबंधीचा अहवाल ते आपल्या वरिष्ठांना देत असल्याची माहिती आहे. भरतीदरम्यान आर्थिक देवाण-घेवाण होत असल्याची माहिती मिळताच कारवाई करा, असे निर्देश त्यांना देण्यात आले आहेत.