पोलिसांच्या विनंती बदल्या रखडल्या
By admin | Published: April 18, 2015 12:05 AM2015-04-18T00:05:16+5:302015-04-18T00:05:16+5:30
पोलीस अधीक्षक कार्यालयातंर्गत दोन वर्षापूर्वी झालेल्या विनंती बदल्या अद्यापर्यंत रखडल्या आहेत.
पोलीस अधीक्षक कार्यालयाची दिरंगाई : नवीन रुजू तरीही जुने जागेवरच
अमरावती : पोलीस अधीक्षक कार्यालयातंर्गत दोन वर्षापूर्वी झालेल्या विनंती बदल्या अद्यापर्यंत रखडल्या आहेत. नवीन कर्मचारी रुजू झाल्यावरही काही जुन्या कर्मचाऱ्यांना अद्याप कार्यमुक्त करण्यात आलेच नाही. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर निघत आहे.
ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाने गेल्या दोन वर्षापूर्वी काही कर्मचाऱ्यांच्या विनंतीवर बदल्या केल्या होत्या. दुसरीकडील कर्मचारी पदावर रुजू झाले आहेत मात्र, जुन्या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात न आल्याने अद्याप ते कर्मचारी पोलीस अधीक्षक कार्यालयातच सेवा देत आहेत. असे १५ च्या जवळपास पोलीस कर्मचारी असल्याचे माहिती पोलीस सूत्रांनी आहे. बदली झालेले पोलीस कर्मचारी पोलीस अधीक्षकांना भेटतात मात्र, त्यांना कार्यमुक्त केल्या जात नाही. असे काही पोलीस कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
पत्रकारांशी सवांद साधण्यात टाळाटाळ
अनेकदा पत्रकारांनी पोलीस अधीक्षक विरेश प्रभु यांच्याशी सपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तसेच मोबाईलवरही सपर्क करण्याचे प्रयत्न केला गेला. मात्र, ते सवांद साधण्यात टाळाटाळ करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणारे पोलीस अधीक्षक पत्रकारांशी सवांद साधण्यास जर टाळाटाळ करीत असेल तर, सामान्य जनतेचा काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नाशिकला बदली तरीही कार्य अमरावतीत
एका पोलीस कर्मचाऱ्यांची दोन वर्षापूर्वी नाशिकला बदली झाली. मात्र अद्यापर्यंत अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत त्यांना कार्यमुक्त करण्यात आले नाही. त्यामुळे ते पूर्वपदावर कार्यरत ठेवण्यात आले. अशी माहिती नाव न छापण्याच्या अटीवर कर्मचाऱ्यांने दिली.