वरूडमध्ये पोलिसांचा रूट मार्च आणि शांतता समितीची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:11 AM2021-07-17T04:11:09+5:302021-07-17T04:11:09+5:30
वरूड : मुस्लिम बांधवांच्या ईद सणानिमित्त शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून पोलीस प्रशासनाने शहरातून पोलिसांचा रूट मार्च ...
वरूड : मुस्लिम बांधवांच्या ईद सणानिमित्त शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून पोलीस प्रशासनाने शहरातून पोलिसांचा रूट मार्च काढला, तर पोलीस ठाण्याच्या सभागृहात शांतता समितीची बैठक पार पडली.
शांतता समितीच्या बैठकीला उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फडतरे, ठाणेदार प्रदीप चौगावकर यांनी कायदा व सुव्यवस्था तसेच शांतता राखण्याचे आवाहन करून ईद सण साजरा करावा. कोविडमुळे सामाजिक अंतर तसेच कापडी मास्कचा वापर करावा. गर्दी न करता धार्मिक कार्यक्रम घरीच पार पाडावे, असे आवाहनसुद्धा यावेळी करण्यात आले. बैठकीला शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. शहरातून पोलिसांचा रूट मार्च काढून राजुरा नाका, आंबेडकर चौक बांगला चौक, मेन रोड, महात्मा फुले चौक आणि परत पोलीस ठाणे असे मार्गक्रमण केले. यामधे पोलीस दल, शीघ्र कृती दलाचे जवान सहभागी झाले होते.