कुलगुरूंच्या तक्रारीविरूद्ध पोलिसांनी मागविली कागदपत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:10 AM2021-06-04T04:10:47+5:302021-06-04T04:10:47+5:30

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने विविध विभागाचे कामकाज ऑनलाईन होण्यासाठी डॉट कॉम ईन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेडला ७२ लाखांचा दिलेले ...

Police sought documents against the vice-chancellor's complaint | कुलगुरूंच्या तक्रारीविरूद्ध पोलिसांनी मागविली कागदपत्रे

कुलगुरूंच्या तक्रारीविरूद्ध पोलिसांनी मागविली कागदपत्रे

Next

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने विविध विभागाचे कामकाज ऑनलाईन होण्यासाठी डॉट कॉम ईन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेडला ७२ लाखांचा दिलेले कंत्राट बेकायदेशीर असल्याप्रकरणी कुलगुरूविरुद्ध दाखल तक्रारीची चौकशी करण्यात येणार आहे. फ्रेजरपुरा पोलिसांनी त्याअनुषंगाने कागदपत्रे मागविली आहेत.

व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य दिनेश सूर्यवंशी यांच्या तक्रारीनुसार तत्कालीन कुलगुरू मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर यांनी पदाचा दुरुपयोग केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करावी, अशी तक्रार दिली आहे. कुलगुरू, प्र-कुलगुरूंनी महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ च्या कलम १४(७) चा दुरूपयोग करुन डॉट कॉम या मर्जीतील कंपनीला ७२ लाखांचे बेकायदेशीर कंत्राट दिले आहे. ५ जानेवारी २०१६ रोजी कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करुन महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ च्या कलम १४ (७) चा वापर करुन बदलला आहे. मूळ अटी, शर्तीला बगल देण्यात आली असून, डॉट कॉम या कंपनीला सोयीच्या ठरतील, अशा अटी टाकण्यात आल्या आहेत. यातून मोठा अपहार झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.

------------

विद्यापीठाचे तत्कलीन कुलगुरू, प्र-कुलगुरूविरोधात तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी अधिकारी नेमण्यात आले आहे. तक्रारकर्त्यांकडून आवश्यक कागदपत्रे मागविण्यात आले आहेत. लवकरच चौकशी सुरू होऊन या प्रकरणातील सत्यता बाहेर आणली जाईल.

- पुंडलिक मेश्राम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, फ्रेजरपुरा

---------------

Web Title: Police sought documents against the vice-chancellor's complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.