पोलीस भरतीच्या तयारीत लागली तरुणाई
By admin | Published: May 27, 2014 12:23 AM2014-05-27T00:23:06+5:302014-05-27T00:23:06+5:30
महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. यासाठी तरुणाईने व्यायामाच्या सरावाला सुरुवात केली आहे. दररोज खुल्या मैदानावर तरुणाई या पोलीस
शिपायाची शेकडो पदे : क्रीडांगणावर सराव, तरुणीही मागे नाहीत अमरावती : महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. यासाठी तरुणाईने व्यायामाच्या सरावाला सुरुवात केली आहे. दररोज खुल्या मैदानावर तरुणाई या पोलीस भरतीसाठी सराव करताना दिसत आहे. अमरावती विभागात सुमारे ८९८ जागा पोलीस शिपायाच्या भरायच्या आहेत. यासाठी महाराष्ट्र पोलीस प्रशानाने जागा भरतीची घोषणा केली असून ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख २५ मे होती. तसेच परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख २६ मे होती. या भरतीसाठी इयत्ता बारावी अथवा पदवीधर अशी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. अमरावती शहर पोलीस आयुक्तालयात शिपाई पदाच्या ८१ जागा भरल्या जाणार आहेत. अमरावती ग्रामीण पोलिसांत २५0 पदे, बुलडाणा ग्रामीणमध्ये १७५, वाशीम ग्रामीणमध्ये ११६, यवतमाळ ग्रामीणमध्ये २७६ शिपाई पदाच्या जागा भरावयाच्या आहेत. यासह राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ९ अमरावती येथे २७ शिपाई पदासाठी भरती होणार आहे. अकोला ग्रामीण पोलिसांमध्ये शिपाई पद रिक्त नसल्याने येथे पदभरती होणार नाही. या पदभरतीसाठी सुशिक्षित बेरोजगार तरुणाई पोलीस भरतीच्या तयारीला लागली आहे. शारीरिक व्यायामाच्या सरावासोबतच लेखी परीक्षेचीही तयारी सुरु केली आहे. यासाठी पोलीस भरती संदर्भातील पुस्तकांची मोठय़ा प्रमाणात विक्री झाली आहे. यात तरुणींनीही पुढाकार घेतल्याचे दिसून येते. शहरातील प्रत्येक खुल्या मैदानात सध्या सराव करताना तरुणाई दिसत आहे.