अमरावती परिक्षेत्रातील २५ पोलीस हवालदार झाले पोलीस उप निरीक्षक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2017 03:25 PM2017-09-23T15:25:39+5:302017-09-23T15:26:08+5:30
अमरावती परिक्षेत्रामध्ये २५ पोलीस हवालदारांना पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती देण्यात आली आहे.
- चेतन घोगरे
अमरावती : महाराष्ट्र पोलीस विभागाअंतर्गत विभागीय परीक्षा २०१३मध्ये घेण्यात आली होती. त्यामध्ये ३१४ पोलीस हवलदारांची पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती महाराष्ट्र राज्यामध्ये देण्यात आली. तसेच अमरावती परिक्षेत्रामध्ये २५ पोलीस हवालदारांना पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती देण्यात आली आहे.
विभागीय अहर्ता परीक्षा २०१३ मध्ये पोलीस हवालदार यांची महाराष्ट् पोलीस खात्या अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदाकरीता परीक्षा दिल्या होत्या. त्यामध्ये राज्यातील एकूण ३१४ पोलीस हवलदारांची पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती झाली. त्यामध्ये अमरावती परिक्षेत्र तसंच विशेष पोलीस महानिराक्षक कार्यालया अंतर्गत येत असलेल्या जिल्ह्यांपैकी यवतमाळ ८,अमरावती १२, बुलढाणा २, अकोला ३ एकूण २५ पोलीस हवलदारांची पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती देण्यात आली आहे. विशेष यामध्ये वाशिम जिल्ह्यातील एकही पोलीस हवलदारांची वर्णी लागली नाही तर अमरावती जिल्ह्यामधील १२ पोलीस हवलदारांची पोलीस उपनिरीक्षक पदी वर्णी लागली आहे. सर्व पदोन्नती प्राप्त अधिकार्यासाठी १५ दिवसाचा "इंडक्शन कोर्स" महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशीक येथे आयोजित करण्यात येणार आहे.व् सदरचे प्रशिक्षण करने सर्वाना बधंनकारक आहे.
न्यायालयीन प्रकरण चालु असणाऱ्या पोहवा ना मिळणार नाही पदोन्नती
कोणत्याही पोलीस हवालदार वर त्याचा विरुद्ध कोणतीही विभागीय चौकशी चालू अथवा प्रलंबित असेल ते कोणत्याही शिक्षा भोगत असतील न्यायालयीन प्रकरण सुरु किंवा प्रलंबित असेल तसेच निलंबित असतील तर त्याना पोलीस उपनिरीक्षक पदावर तात्पुरती पदोन्नती न देता त्या बाबतचा सविस्तर २९ सप्टेम्बर २०१७ पूर्वी अहवाल सादर करावा लागेल.