पोलीस महिलेची फसवणूक, लैंगिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 12:03 AM2017-07-18T00:03:26+5:302017-07-18T00:03:26+5:30

पहिले लग्न लपवून महिला पोलिसासोबत दुसरा विवाह केला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Police victim's victimization, sexual abuse | पोलीस महिलेची फसवणूक, लैंगिक अत्याचार

पोलीस महिलेची फसवणूक, लैंगिक अत्याचार

Next

गुन्हे दाखल करण्यास दिरंगाई : गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील घटना
अमरावती : पहिले लग्न लपवून महिला पोलिसासोबत दुसरा विवाह केला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडितेने आठवडाभरापूर्वीच गाडगेनगर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदविली आहे. मात्र, याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात पोलिसांकडून दिरंगाई होत आहे. पोलीस कर्मचारी असलेल्या महिलेलाच जर न्यायासाठी भटकावे लागत असेल तर इतरांचे काय, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कार्यरत महिला पोलिसाने पहिल्या पतीला घटस्फोट दिल्यानंतर ती तिच्या १३ वर्षीय मुलीला घेऊन राहात होती. दरम्यान २८ एप्रिल २०१६ रोजी महिला पोलिसाची ओळख मंगेश माणिक शिरसाठ (२८) नामक तरूणाशी झाली. मंगेश हा जबलपूर येथे स्पेशल टास्क फोर्समध्ये कार्यरत असल्याचे महिलेला कळले. त्यानंतर दोघांचेही फोनवर बोलणे सुरू झाले. मंगेश अमरावतीमधील विद्युत नगराजवळील अभियंता कॉलनीत राहत असल्यामुळे तो वारंवार महिला पोलिसाच्या घरी भेटायला यायचा. अविवाहित असल्याची बतावणी करून मंगेशने तिच्याशी खासगी विवाह मंडळात विवाह केला. मात्र, ते विवाह प्रमाणपत्र खोटे असल्याचे पीडितेला काही दिवसांनी समजले.
मंगेश हा वारंवार रजा घेऊन पीडितेला भेटायला यायचा आणि लैंगिक शोषण करायचा. जून २०१७ मध्ये मंगेश पीडितेच्या घरी आला असता त्याने पुन्हा तिच्यावर जबरीने लैंगिक अत्याचार केले आणि तो विवाहित असल्याचे पीडितेला सांगितले. केवळ शारीरिक संबधांसाठी लग्न केल्याचे पीडितेला कळताच तिने मंगेशच्या घरी जाऊन शहानिशा केली असता फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याबाबतची तक्रार तिने १० जुलै रोजी गाडगेनगर पोलिसांकडे दिली आहे. मात्र, अद्याप पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसून प्रकरण विधी अधिकाऱ्यांकडे पाठविले आहे.

महिलेने गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. तिच्या संमतीने संबंध प्रस्थापित झाले आहेत. केवळ तिची फसवणूक झाल्याचे या प्रकरणात निदर्शनास येत आहे. हे प्रकरण विधी अधिकाऱ्याकडे पाठविण्यात आले.
- दत्तात्रय मंडलिक,
पोलीस आयुक्त.

Web Title: Police victim's victimization, sexual abuse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.