४५ चेकपोस्टवरील पोलीस झाले कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 06:00 AM2020-03-30T06:00:00+5:302020-03-30T06:01:00+5:30
जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी पूर्वी सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत शिथिलता दिली होती. त्यानंतर दिवसभर जीवनआश्यक वस्तुंची दुकाने सुरू राहतील, असा आदेश निर्गमित झाला व एकाच दिवसात रविवारनंतर सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तू खरेदी करता येतील, असा सुधारित आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला. त्यामुळे रोज आदेश बदलत असल्याने पोलीस प्रशासनातही संभ्रम निर्माण झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : रविवार २२ मार्च रोजी देशभर जनता कर्फ्यू यशस्वी झाला. त्यानंतर २३ मार्च रोजी संपूर्ण देशात संचारबंदीची घोषणा झाली. संपूर्ण देशच २४ मार्चपासून 'लॉकडाऊन' करण्याचा निर्णय शासनाने घेतला.
जिल्ह्यात २३ व २४ मार्च या दोन दिवसांत तीव्र स्वरुपात संचारबंदीचा अनुभव नागरिकांना आला. पण नागरिकांना दंडुक्याचा प्रसाद देऊ नये, असे निर्देश खुद्द मुख्यमंत्र्यांनीच दिल्याने संचारबंदीत शिथिलता आली. २९ मार्च रोजी दुपारी २ वाजतानंतर रस्त्यावर शुकशुकाट दिसून आले. पूर्वीच्या तुलनेत शहर हद्दीतील ४५ ठिकाणी लावलेल्या नाकेबंदीतही शिथिलता आली असून या ठिकाणचे शेकडो पोलीस कमी केल्याची माहिती पुढे आली आहे.
जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी पूर्वी सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत शिथिलता दिली होती. त्यानंतर दिवसभर जीवनआश्यक वस्तुंची दुकाने सुरू राहतील, असा आदेश निर्गमित झाला व एकाच दिवसात रविवारनंतर सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तू खरेदी करता येतील, असा सुधारित आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला. त्यामुळे रोज आदेश बदलत असल्याने पोलीस प्रशासनातही संभ्रम निर्माण झाला आहे. जीवनावश्यक वस्तुंच्या दुकानावर रोज गर्दी वाढल्याचा अनुभव आला. मात्र, नागरिकांना त्रास देऊ नये, असे आदेश शासनच काढत असल्याने पोलीसही हतबल झाल्याची चित्र रविवारी दिसून आले. नागरिकांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही. त्यामुळे २३ व २४ मार्च रोजी जसे ८०० पोलीस व १५० पेक्षा अधिक अधिकारी रस्त्यावर उतरले होते. त्या तुलनेत २९ मार्च रोजी रविवारी पोलीस रस्त्यावर दिसून आले नाही. रविवारी दुपारी २ वाजतानंतर शहरात फेरफटका मारला असता, राजकमल चौक, इतवारा, चित्रा चौक, इर्विन चौक व पंचवटी चौकासह इतर महत्त्वाच्या चौकात बोटावर मोजण्याइतकेच पोलीस रस्त्यावर होते. मात्र, आरोग्य सेवेकरिता रस्त्यावर फिरणारे आरोग्य सेवक, इतर कर्मचारी, आरोग्य सेवेकरिता बाहेर पडणारे नागरिक वगळता रस्त्यावर शुकशुकाट बघावयास मिळाला. त्यामुळे आता पोलिसांचा ताण काहिसा कमी झाला आहे.
शहरातील पोलीस बंदोबस्त कमी केलेला नाही. परंतु ज्या ठिकाणी आवश्यकता आहे. किंवा बाहेर जिल्ह्यातून दाखल होणाºया नागरिकांवर वॉच ठेवण्यासाठी ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात नियोजन केले आहे.
- संजयकुमार बाविस्कर, पोलीस आयुक्त अमरावती