धामणगावात पोलिसांना मिळणार हक्काचे घरकुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 12:04 AM2018-01-10T00:04:01+5:302018-01-10T00:04:19+5:30

The police will get the help of the villagers | धामणगावात पोलिसांना मिळणार हक्काचे घरकुल

धामणगावात पोलिसांना मिळणार हक्काचे घरकुल

Next
ठळक मुद्देवीरेंद्र जगताप यांचे प्रयत्न : ३२ कोटी रुपये मंजूर

आॅनलाईन लोकमत
धामणगाव रेल्वे : गत अनेक वर्षांपासून भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याना आता हक्काचे घरकुल मिळणार असून, तीन पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या या घरकुलाला धामणगावचे आमदारवीरेंद्र जगताप यांनी न्याय दिला आहे. ३२ कोटी रुपये शासनाकडून मंजूर करून आणले आहेत़
अमरावती ग्रामीण पोलीस अंतर्गत दत्तापूर, मंगरूळ दस्तगीर, तळेगाव दशासर येथील पोलीस कर्मचाºयांना राहण्यासाठी निवासस्थाने नव्हती. एक शतकापूर्वी बांधलेल्या या पडक्या खोलीत पोलीसांच्या कुटुंबांना राहावे लागत असत. आ़ वीरेंद्र जगताप यांनी पाठपुरावा करीत दत्तापूर २१ कोटी ६५१ लक्ष, मंगरूळ दस्तगीर ५ कोटी ४४ लक्ष, तळेगाव दशासर ५ कोटी ५३ लक्ष रुपये मंजूर करून आणले आहेत़ कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरिता अविरत असणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना हक्काचे घरकुल आ़ वीरेंद्र जगताप यांच्या पाठपुराव्यामुळे मिळत असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे़

धामणगाव तालुक्यातील तीन पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी ही रक्कम शासनाकडून मंजूर करून घेतली़ आता चांदूर रेल्वे व नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पोलीस कर्मचाºयांना हक्काचे घरकुल आगामी काळात मिळण्यासाठी आपला पाठपुरावा सातत्याने सुरू राहणार आहे़
- वीरेंद्र जगताप, आमदार, धामणगाव-चांदूर रेल्वे मतदार संघ

Web Title: The police will get the help of the villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.