पोलिसाची एसटी वाहकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 01:10 AM2019-06-03T01:10:42+5:302019-06-03T01:11:30+5:30

पोलीस शिपायाच्या भावाचा मृत्यू झाल्याचे कळताच राजापेठ ठाण्यात कार्यरत पोलीस शिपाई तातडीने कुटंबीयांसमवेत मोर्शी तालुक्यातील दापुरी येथे निघाले. बसमध्ये बसल्यानंतर तिकीट घेताना मोर्शीच्या आधीचे दापुरी गावाजवळ बस थांबविण्यास वाहकाने नकार दिल्याने संतापलेल्या पोलीस शिपायाने एसटी वाहकाच्या कानशिलात लगाविली.

Policeman beating the ST carrier | पोलिसाची एसटी वाहकाला मारहाण

पोलिसाची एसटी वाहकाला मारहाण

Next
ठळक मुद्देमध्यवर्ती आगारातील घटना : तासभर चक्काजाम, वाहतुकीची कोंडी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पोलीस शिपायाच्या भावाचा मृत्यू झाल्याचे कळताच राजापेठ ठाण्यात कार्यरत पोलीस शिपाई तातडीने कुटंबीयांसमवेत मोर्शी तालुक्यातील दापुरी येथे निघाले. बसमध्ये बसल्यानंतर तिकीट घेताना मोर्शीच्या आधीचे दापुरी गावाजवळ बस थांबविण्यास वाहकाने नकार दिल्याने संतापलेल्या पोलीस शिपायाने एसटी वाहकाच्या कानशिलात लगाविली. ही घटना रविवारी सकाळी ८.२० वाजता दरम्यान मध्यवर्ती आगारात घडली. घटनेनंतर वाहक चालकांच्या संघटनेने रस्त्यावर एसटी आडवी लावून एक तासभर चक्काजाम आंदोलन केल्याने आगारासमोरील मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
राजापेठ ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस शिपाई विजय नागले (रा.पोलीस मुख्यालय क्वार्टर्स) असे आरोपीचे नाव असून, फिर्यादी प्रवीण मधुकर रामदे (४५, रा. मुदलीयारनगर) असे वाहकाचे नाव आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तातडीने सिटी कोतवाली ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहचले. मारहाण करणाऱ्या पोलिसावर गुन्हा दाखल करून अटक होईस्तर हटणार नाही, अशी भूमिका वाहक-चालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतल्याने पोलिसांची तारंबळ उडाली. तसेच बस आडवी केल्याने रेल्वे स्टेशन ते शिवटेकडीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सिटी कोतवालीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस.व्ही बचाटे हे घटनास्थळीर पोहचले. वाहकाने तक्रार द्यावी, आम्ही गुन्हा दाखल करतो. मात्र बसेस बंद ठेवून वाहतूक कोंडी करू नये, आंदोलन मागे घ्यावे, अशी मध्यस्थी केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. तासभरानंतर वाहतूक सुरळीत झाली. आरोपीविरुद्ध वाहकाच्या तक्रारीनंतर कोतवाली पोलिसांनी भांदविच्या कलम ३५३, ३२३, ५०४,५०६ अन्वये गुन्हा नोंदविला. मात्र, पोलीस शिपायाला भावाच्या अंतविधीसाठी जायचे असल्याने अटक केली नव्हती.

पोलीस शिपायला यामुळे आला संताप
भावाचा मृत्यू झाल्याची माहिती शिपाई विजय नागले यांना मिळताच त्यांनी तातडीने कुटुंबासह गावी जाण्यासाठी आगारात धाव घेतली. ते मोर्शी बसमध्ये बसले असता माझा भाऊ मरण पावला आहे. त्यामुळे तिकीट मोर्शीची घ्या, पण आदल्या गावात उतरुन द्या, अशी विनंती त्यांनी वाहकाला केली. पण मध्ये बस थांबणार नाही. आपण उतरुण जावे, असे म्हणून वाहकाने वाद घातला. आधीच चिंतेत असलेल्या विजय यांचा संयम सुटला व रागात त्यांनी वाहकाच्या कानशिलात लगावल्याची माहिती प्रथमदर्शींनी दिली.

वाहकाच्या तक्रारीवरून पोलीस कर्मचाºयावर गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास सुरू आहे.
- एस. व्ही. बचाटे,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक

सहकाºयाला मारहाण झाल्याने गोंधळ निर्माण झाला होता. त्या कारणाने पोलिसावर कारवाई करण्याची सर्वांची मागणी होती.
- नितीन जयस्वाल,
आगार व्यवस्थापक

Web Title: Policeman beating the ST carrier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.