फायर ऑडिटला ठेंगा दाखविणार्यांविरूध्द पोलीसी हंटर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:17 AM2021-09-04T04:17:29+5:302021-09-04T04:17:29+5:30
अमरावती: इमरजंसी एक्झिट, पुरेशा हवा, प्रकाश नसण्याबरोबरच सक्षम अग्निरोधक यंत्रणा नसल्याने हॉटेल इम्पेरियामध्ये नागपूरच्या दिलीप ठक्कर यांना प्राण गमवावे ...
अमरावती: इमरजंसी एक्झिट, पुरेशा हवा, प्रकाश नसण्याबरोबरच सक्षम अग्निरोधक यंत्रणा नसल्याने हॉटेल इम्पेरियामध्ये नागपूरच्या दिलीप ठक्कर यांना प्राण गमवावे लागले. त्यापाश्वभूमिवर फायर ऑडिटला ठेंगा दाखविणार्यांवर पोलीसी हंटर बरसण्याचे संकेत आहेत. फायर ऑडिट संदर्भात पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी महापालिका, अग्निशमन विभाग व हॉटेल लॉज, कोचिंग क्लास, मॉलधारक व अन्य आस्थापनाधारकांची बैठक बोलावली आहे. पोलीस आयुक्तालयातील सभागृहात ८ सप्टेंबर रोजी ती बैठक होईल.
शहरातील कोणत्या आस्थापनांत अग्नीरोधक यंत्रणा असणे, आवश्यक आहे, कुठल्या आस्थापनांना ‘फायर ऑडिट’ बंधनकारक आहे, अशा शहरात किती आस्थापना आहेत, पैकी आतापर्यंत किती आस्थापनांनी फायर ऑडिट करवून घेतले, किती आस्थापनांनी त्यासाठी अर्ज केलेत, फायर ऑडिटसाठी नोंदणीकृूत संस्था कोणत्या, यासह अन्य अनुषंगिक बाबींची माहिती महापालिकेच्या अग्निशमन विभागााकडून घेतली जाणार आहे. याशिवाय हॉटेल, लॉज, मॉल, रूग्णालये, कोचिंग क्लासेसना फायर ऑडिट करवून घेण्यासाठी कुठला अडसर आहे का, याबाबींचा उहापोह केला जाणार आहे. महापालिकेच्या संबंधित अधिकार्यांना त्यासाठी उपस्थित राहावे लागणार आहे. पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह या त्या बैठकीच्या कॅप्टन असतील.
बाॅक्स
अग्निशमन विभाग शून्य
हॉटेल इम्पेरियामधील आगीत नागपूरकराचा बळी गेल्यानंतर महापालिकेच्या अग्निशमन विभागाला जाग आली. अवघ्या ४ ते ५ हॉटेलची पाहणी करून फायर ऑडिटसाठी संबंधितांना १५ दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आल्याचे राणा भीमदेवी थाटात महापालिकेकडून सांगण्यात आले. मात्र, त्या विभागाकडे फायर ऑडिट बंधनकारक असणार्या आस्थापंनांची अचूक आकडेवारी देखील नाही. फायर ऑडिट संदर्भात आस्थापनांची संख्येचा मुद्दा आला की, आरोग्य, शिक्षण, एडीटीपी, बाजार परवाना विभागाकडे अंगुलीनिर्देश केला जातो.
//////////////////////////
बॉक्स
राजापेठ पोलिसांकडून मॉलविरूद्ध गुन्हा
राजापेठ मार्गावरील एका माॅलचे फायर ऑडिट झाले नसतानाही ते सुरू ठेवल्याचे लक्षात येताच राजापेठ पोलिसांनी मॉलचे संचालक व व्यवस्थापकाविरूद्ध भादंविचे कलम १८८, सहकलम ३, ३६ महाराष्ट्र आत्त प्रतिबंधक अधिनियम, जीवरक्षक उपाययोजना अधिनियम २००६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. जानेवारीच्या दुसर्या आठवड्यात ही कारवाई करण्यात आली होती.
/////////////
कोट
फायर ऑडिटसंदर्भात ८ सप्टेंबर रोजी महापालिका व संबंधितांची बैठक घेण्यात येईल. त्यात फायर ऑडिटबाबत महापालिकेच्या अग्निशमन यंत्रणेकडून माहिती घेण्यात येईल.
डॉ. आरती सिंह,
पोलीस आयुक्त, अमरावती