पालकमंत्र्यांच्या हस्ते पोलिओ लसीकरणाचा श्रीगणेशा

By admin | Published: January 18, 2016 12:01 AM2016-01-18T00:01:46+5:302016-01-18T00:01:46+5:30

महानगरपालिकेंर्तगत सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने आयोजित राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंर्तगत ...

Polio vaccination on behalf of Guardian Minister | पालकमंत्र्यांच्या हस्ते पोलिओ लसीकरणाचा श्रीगणेशा

पालकमंत्र्यांच्या हस्ते पोलिओ लसीकरणाचा श्रीगणेशा

Next

पोलिओमुक्तीचे स्वप्न : आरोग्य विभागाला केले आवाहन
अमरावती : महानगरपालिकेंर्तगत सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने आयोजित राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंर्तगत रविवारी सकाळी १० वाजता येथील वडाळी परिसरातील श्रीराम विद्यालयातील पोलिओ बुथवर गार्गी नावाच्या मुलीला पोलिओचा डोज देऊन पोलिओ लसीकरणाचा श्रीगणेशा पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केला.
यावेळी ना. पोटे यांनी पोलिओमुक्त भारताचे स्वप्न प्रत्येकाचे असून यापुढे देशात एकही पोलिओचा रुग्ण आढळू नये, असे आवाहन केले. पोलिओ रुग्णांची संख्या शून्यावर आणण्यासाठी आरोग्य विभागाने सर्वार्थाने प्रयत्न केल्यास ते शक्य आहे. जिल्हा पोलिओमुक्त करण्यासाठी प्रशासनस्तरावर आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोलिओमुक्तीचे स्वप्न लवकरच साकार होईल, असा आशावाद ना. प्रवीण पोटे यांनी व्यक्त केला. ही मोहीम युध्दस्तरावर राबविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Polio vaccination on behalf of Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.