राजकीय वादातून आयुक्तांच्या कक्षाला फासले काळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 11:15 PM2019-02-11T23:15:51+5:302019-02-11T23:16:12+5:30

साईनगर प्रभागातील आॅक्सिजन पार्कचे गत महिन्यात झालेल्या भूमिपूजनातील श्रेयवादाचा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे. या राजकीय वादातून सोमवारी दुपारी शिवसेना नगरसेविकेच्या पतीने महापालिका आयुक्तांच्या कक्षाच्या दाराला काळे फासण्याचा प्रकार घडला. याची तक्रार महापालिका प्रशासनाद्वारा कोतवाली ठाण्यात करण्यात आली.

In the political dispute, the commissioner's cell broke out | राजकीय वादातून आयुक्तांच्या कक्षाला फासले काळे

राजकीय वादातून आयुक्तांच्या कक्षाला फासले काळे

Next
ठळक मुद्देआॅक्सिजन पार्कच्या भूमिपूजनाचा मुद्दा : शिवसेना नगरसेविकेच्या पतीचा प्रताप

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : साईनगर प्रभागातील आॅक्सिजन पार्कचे गत महिन्यात झालेल्या भूमिपूजनातील श्रेयवादाचा मुद्दा चव्हाट्यावर आला आहे. या राजकीय वादातून सोमवारी दुपारी शिवसेना नगरसेविकेच्या पतीने महापालिका आयुक्तांच्या कक्षाच्या दाराला काळे फासण्याचा प्रकार घडला. याची तक्रार महापालिका प्रशासनाद्वारा कोतवाली ठाण्यात करण्यात आली.
महापालिकेत दुपारी तीनच्या दरम्यान आयुक्त बाहेर गेले होते. त्यामुळे तेथील चतुर्थ श्रेणी कर्मचारी जेवायला गेले. दरम्यान, शिवसेना नगरसेविका मंजुश्री जाधव यांचे पती प्रशांत जाधव आले व त्यांनी आयुक्त संजय निपाणे यांच्या कक्षाच्या दाराला काळा रंग फासला. या प्रकाराने माहापालिकेत एकच गोंधळ उडाला.
हरित क्षेत्र विकासांतर्गत शहरात ‘अमृत’ योजनेंतर्गत पाच ठिकाणी कामे सुरू आहेत. याच कामाचे भूमिपूजन एका नगरसेवकाने जानेवारी महिन्यात केले. त्यामध्ये फक्त भाजपच्याच नगरसेवकांची नावे छापण्यात आलीत. यासंदर्भात उद्यान अधीक्षक प्रमोद येवतीकर व अभियंता प्रमोद कुळकर्णी यांच्याशी चर्चा केल्याचे जाधव यांनी सांगितले. या कामासाठी केंद्र, राज्य व महापालिकेचा निधी असल्याने खासदार, आमदार व स्थानिक सर्व नगरसेवकांना भूमिपूजनाला बोलवायला पाहिजे, असे जाधव यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात आयुक्तांशी चर्चा केली असता, त्यांनी घोंगडे झटकले. पंतप्रधान आवास योजनेचे भूमिपूजन घेता येते, तर या कामाचे का नाही, असा सवाल जाधव यांनी केला. याबाबत माहापालिका आयुक्त व अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव असल्याचे ते म्हणाले. मात्र, हे भूमिपूजन कुणी केले व दबाव कोणाचा, यावर त्यांनी बोलण्याचे टाळले. महापालिकेचे दिंवगत नगरसेवक दिंगबर डहाके यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर वर्धमान नगर व अस्मिता कॉलनीतील डांबरीकरणाच्या कामाचे मागील महिन्यात भूमिपूजन झाले. कामांची वर्कआर्डर झालेली असताना कामाला सुरूवात नाही. कंत्राटदारांना विचारले, तर आमच्यावर राजकीय दबाव असल्याचे सांगण्यात येते. आयुक्त म्हणतात, आज ना उद्या रस्त्याचे काम होईल. त्यामुळे महापालिका प्रशासनाविरुद्ध आमचे आंदोलन असल्याचे जाधव म्हणाले.
सवंग अन् स्वस्त प्रसिद्धीसाठी प्रकार
या व्यक्तीला आपन ओळखत नाही. यांच्याशी कधी चर्चा झालेली नाही. दुपारला बाहेर गेल्यावर हा प्रकार करण्यात आल्याने सवंग व स्वस्त्या प्रसिद्धीचा हा प्रकार आहे. या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो, असे आयुक्त म्हणाले. कमकुवत मनोवृत्तीचा हा प्रकार आहे. यामुळे माझ्या व कर्मचाºयांच्या कामकाजावर कोणताही फरक पडणार नाही. याउलट अधिक जोमाने आम्ही काम करू, याबाबत पोलिसांत तक्रार दिलेली असल्याचे आयुक्त संजय निपाणे म्हणाले.

या व्यक्तीला आपण ओळखत नाही. त्यांच्याशी या कामासंदर्भात चर्चा झालेली नाही. या प्रकाराचा निषेध करतो. झाल्या प्रकाराची तक्रार पोलिसांत देण्यात आली आहे.
- संजय निपाणे
आयुक्त, महापालिका

दोन वर्षांपूर्वी प्रशांत जाधव यांना पक्षात प्रवेश दिला. त्यांचा अलीकडे पक्षांशी संबंध नाही. त्यांच्या पत्नी शिवसेच्या नगरसेविका आहेत. या प्रकरणाशी आयुक्तांचा संबंध नाही.
- प्रशांत वानखडे
गटनेता, शिवसेना

Web Title: In the political dispute, the commissioner's cell broke out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.