मेळघाटात आरोग्य यंत्रणेची पोलखोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 10:11 PM2017-11-02T22:11:54+5:302017-11-02T22:12:07+5:30

राज्य विधिमंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीने गुरुवारी मेळघाटात दौरा केला. यात डिजिटल व्हिलेज असलेल्या हरिसाल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात समितीसमक्ष...

Polk of health system in Melghat | मेळघाटात आरोग्य यंत्रणेची पोलखोल

मेळघाटात आरोग्य यंत्रणेची पोलखोल

googlenewsNext
ठळक मुद्देअनुसूचित जमाती कल्याण समिती पदाधिकाºयांचे आश्रमशाळेत जेवण : बेपत्ता भरारी पथकावर कारवाईचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : राज्य विधिमंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीने गुरुवारी मेळघाटात दौरा केला. यात डिजिटल व्हिलेज असलेल्या हरिसाल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात समितीसमक्ष आदिवासींनी आरोग्य विभागाचे भरारी पथक मुख्यालयी राहत नसल्याने रुग्णांची हेळसांड होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर सदस्यांनी हा विषय गांभीर्याने घेत संबंधितांना जाब विचारून कारवाईचे निर्देश दिले. त्यामुळे समितीपुढेच आरोग्य यंत्रणेची पोलखोल उघड झाली.
‘एस.टी’ कल्याण समितीने मेळघाटातील शाळा, दवाखाने, रोपवाटिका, निसर्ग संकुलात समितीने भेट दिली. मेळघाटात ११ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १२२ भरारी पथक असून या पथकांची वाहने अमरावती येथे राहत असल्याचे वास्तव आदिवासींनी समितीच्या पुढ्यात ठेवले. त्यानंतर समितीने सेमाडोह निसर्ग निर्वाचन संकुलात जाऊन वन्यप्राण्यांसह वाघांचीही माहिती घेतली. बोरी गावात वनविभागाच्या रोपवाटिकेत वनौषधीच्या वनस्पतींची माहिती घेत मधुमेहाच्या उपचारासाठी वापरले जाणारे 'इन्सुलेशन' याची माहिती घेतली. हरिसाल येथील रेशन दुकानातील डी-१ रजिस्टर नसल्याने सदस्यांनी संबंधिताना जाब विचारला. मात्र, अमरावती येथे नेण्यात आलेले रजिस्टर संबंधित अधिकाºयांसोबत असल्याने आॅनलाईन विक्री धान्याची पावतीसह साठा तपासला. दरम्यान मेळघाटचे आमदार प्रभुदास भिलावेकर यांच्या निवासस्थानी समितीने भेट दिली. त्यानंतर ताफ्यातील एका समितीची चमू धारणी तालुक्यातील लवादा, सार्कदा व कुटंगा या गावात आदिवासींसाठी राबविल्या जाणाºया योजनांच्या पाहणीसाठी रवाना झालेत, तर समितीची दुसरी चमू चिखलदरा तालुक्यातील अतिदुर्गम असलेल्या रायपूर, हतरू या भागासाठी निघाले होते. यावेळी समितीचे प्रमुख अशोक उईके यांनी वाहनातून खाली उतरून आदिवासी शेतकºयांसोबत संवाद साधला. सौर उर्जा कुंपणासून वन्यप्राण्यांचे संरक्षणाची माहिती जाणून घेतली. एकंदरित समितीने आदिवासींच्या योजना, उपक्रमांची गांभीर्याने दखल घेतली. धारणीत आदिवासी सांस्कृतिक भवन निर्मिती बांधकामाची पाहणी समितीने केली. दौºयात विविध आदिवासी संघटना, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी संघटनांनी समितीची भेट घेऊन समस्या, मागण्यांचे निवेदन सादर केले. समितीत श्रीकांत देशपांडे, पास्कल धनारे, संजय पुराम, पंकज भोयर, राजाभाऊ वाजे, शांताराम मोरे, अमित घोडा, संतोष टारफे, वैभव पिचड, पांडुरंग वरोरा, आनंद ठाकूर, चंद्रकांत रघुवंशी या आमदारांचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांचे जेवण तपासले
आ. अशोक उईके यांच्या नेतृत्वातील समितीने टिंटबा येथील आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना दिले जाणारे जेवण घेतले. विद्यार्थ्यांच्या जेवणात नेमके कोणते मेनू, दर्जा आणि चवदेखील घेतली. मात्र, समिती दौºयावर असल्याच्या पार्श्वभूमीवर मेळघाटातील आश्रमशाळा, वसतिगृहांमध्ये बºयापैकी सुधारणा झाल्याचे चित्र अनुभवता आले.
५७ वाहनांचा ताफा
धारणी, चिखलदरा तालुक्यात ‘एसी.टी’ कल्याण समिती दौºयावर असताना त्यांच्या दिमतीला ५७ वाहनांचा ताफा होता. यात विविध विभाग प्रमुख, मेळघाटशी संबंधित यंत्रणेचे अधिकारी वाहनांच्या ताफ्यात होते. उपसचिव, अवर सचिवांचाही समावेश होता.
 

Web Title: Polk of health system in Melghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.