Lok Sabha Election 2019; अमरावती जिल्ह्यात मतदान शांततेत सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 10:30 AM2019-04-18T10:30:48+5:302019-04-18T10:33:03+5:30
जिल्ह्यात मतदान शांततेत प्रारंभ अमरावती प्रतिनिधी जिल्ह्यातील दोन हजार मतदान केंद्रांवर लोकसभेच्या निवडणुकीसाठी १८ एप्रिल रोजी सकाळी ७ पासून मतदान शांततेत सुरू झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: जिल्ह्यात मतदान शांततेत प्रारंभ अमरावती प्रतिनिधी जिल्ह्यातील दोन हजार मतदान केंद्रांवर लोकसभेच्या निवडणुकीसाठी १८ एप्रिल रोजी सकाळी ७ पासून मतदान शांततेत सुरू झाले. दोन दिवसांपासून सूर्याचा ताप कमी झाला आज दिवसभरात ३६ ते ३८ अंश सेल्सिअस तापमान राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे मतदारांमध्ये मतदानासाठी बाहेर पडण्याचा उत्साह सकाळपासून कायम आहे. सकाळी नऊ वाजता हाती आलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात टक्के मतदान झाले ही टक्केवारी संथ असली तरी तापमानाने दिलासा दिल्यामुळे दिवसभरात मतदानाची टक्केवारी समाधानकारक राहील असा अंदाज व्यक्त होत आहे. अद्याप अनुचित प्रकाराची कुठेही घटना पुढे आलेली नाही. शहरी भागासह ग्रामीण भागातदेखील मतदानासाठी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघात विधानसभेचे आठ मतदारसंघ येतात. त्यापैकी धारणी व मेळघाटातील आदिवासी रोजगारासाठी स्थलांतर करीत असल्याने आणि यंदा एकंदरच प्रचाराला वेळ कमी मिळाल्यामुळे येथील टक्केवारी जेमतेम राहील अशी शक्यता आहे. लग्नाची दाट तिथी असल्यामुळे या सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्यांची सायंकाळी मतदानासाठी गर्दी होणार असल्याची चिन्हे आहेत. भाजप-सेना युतीचे आनंदराव अडसूळ काँग्रेस महा आघाडी समर्थित नवनीत राणा यांच्यात थेट लढत आहे. वंचित आघाडीचे गुणवंत देवपारे व बसपाचे अरुण वानखडे आपल्याकडे किती मते वळवतात याचाही अंदाज राजकीय जाणकार घेत आहेत युतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांचे मुंबई येथील मतदार यादीत नाव असल्याने ते अमरावतीला मतदान करणार नाहीत.