मतदान, मतमोजणीमध्ये ११ मतांचा घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 01:13 AM2019-06-03T01:13:39+5:302019-06-03T01:14:01+5:30

लोकसभा मतदारसंघात झालेले मतदान व आरओंनी आयोगाला पाठविलेला अहवाल त्यानंतर झालेली मतमोजणी यामध्ये ११ मतांचा घोळ झालेला आहे. आयोगाने नंतर दिलेल्या लिंकनंतर जिल्हा निवडणूक विभागाने हा घोळ निस्तरला असला तरी याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई केव्हा, असा मतदारांचा सवाल आहे.

Polling, counting of 11 votes in counting | मतदान, मतमोजणीमध्ये ११ मतांचा घोळ

मतदान, मतमोजणीमध्ये ११ मतांचा घोळ

googlenewsNext
ठळक मुद्देअमरावती लोकसभा क्षेत्र : मतदानाची आकडेवारी पाच मतदारसंघात कमी-अधिक, नंतर जुळविले आकडे

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : लोकसभा मतदारसंघात झालेले मतदान व आरओंनी आयोगाला पाठविलेला अहवाल त्यानंतर झालेली मतमोजणी यामध्ये ११ मतांचा घोळ झालेला आहे. आयोगाने नंतर दिलेल्या लिंकनंतर जिल्हा निवडणूक विभागाने हा घोळ निस्तरला असला तरी याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई केव्हा, असा मतदारांचा सवाल आहे.
जिल्हा निवडणूक विभागाशी यासंदर्भात संपर्क साधला असता उपजिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील यांनी ही बाब प्रथम: नाकारली. आरओंनी आयोगाला पाठविलेले पत्राची कॉपी दाखविल्यावर मात्र, त्यांनी अमरावती व तिवसा विधानसभा मतदारसंघातील काही केंद्रामधील आकडेवारीमध्ये तफावत आल्याची बाब त्यांनी मान्य केली. आयोगाद्वारा पारदर्शी कारभार व एकेका मताची पडताळणी व सर्व मेळ जुळविण्याला महत्त्व दिले जातात. यासाठी आयोगाद्वारा एका लोकसभा मतदारसंघात किमान एक कोटीवर खर्च केला जात असताना दर्यापूर वगळता बाकी सर्व मतदारसंघांत मतदानातील आकडेवारीचा घोळ झालेला असल्याचे वास्तव आहे.
अमरावती लोकसभा मतदारसंघात १८ एप्रिल रोजी मतदान झाले. यादिवशी रात्री उशिरा निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश नवाल यांनी अमरावती लोकसभेसाठी ११ लाख ४ हजार ९३६ मतदान झाल्याचे जाहीर केले. यामध्ये ६ लाख २ हजार ८ पुरूष व ५ लाख २ हजार ९२१ स्त्री व इतर ७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला ही ६०.३६ टक्केवारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. १९ एप्रिल रोजी आरओंद्वारा मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांना झालेल्या मतदानाचा मेलदेखील करण्यात आला. त्यामध्ये फॉरमॅट ‘ए’ व ‘बी’ सादर करण्यात येत असल्याचे आरओ शैलेश नवाल यांनी स्पष्ट केले. मीडिया सेलद्वारा झालेल्या मतदानाची हीच आकडेवारी सर्व माध्यमांना देण्यात आली. विशेष म्हणजे आयोगाद्वारा यावेळी प्रथमच लोकसभा निवडणुकीत संबंधित ‘एआरओं’ना आयोगाच्या सुविधा पोर्टलमध्ये झालेल्या मतदानाची माहिती आॅनलाईन भरावयाची होती. त्यानुसार सर्व एआरओंद्वारा ही प्रक्रिया करण्यात येऊन माहिती सुविधा पोर्टलवर अपलोड करण्यात आली. त्यानंतर आरओंनी अंतिम मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध केली होती.
अमरावती लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी ही २३ मे रोजी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. त्यानंतर रात्री १० च्या सुमारास निकाल जाहीर करण्यात आला व विजयी उमेदवारास प्रमाणपत्र देण्यात आले. पहिल्या दोन उमेदवारांमध्ये ३६,९५१ मतांची तफावत असल्याने ११ मतांच्या घोळाकडे दुर्लक्ष झाले, ही वस्तुस्थिती आहे. मतमोजणीअंती सर्व उमेदवारांना टपाली व्यतिरिक्त एकूण १० लाख ९९ हजार ७४७ वैध मते व ५ हजार २०० नोटा असे एकूण ११ लाख ४ हजार ९४७ मते असल्याचे स्पष्ट झाले. म्हणजेच मतदानानंतर जाहीर मतांच्या तुलनेत मतमोजणीत ११ मतांचा घोळ यात झाल्याची बाब पुढे आली आहे. यासाठी दोषी अधिकारी व कर्मचाºयांवर कारवाई करण्याऐवजी घोळ निस्तरला यातच निवडणूक विभाग धन्यता मानत आहे, ही दुर्देवाची बाब आहे.

आयोगाने पुन्हा दिली ‘सुविधा’ची लिंक
मतदानाचे १८ एप्रिलला सर्व एआरओंना झालेल्या मतदानाची माहिती आयोगाच्या सुविधा पोर्टवर आॅनलाईन अपलोड करायची होती. त्यामुळे सर्व एआरओद्वारा विधानसभा निहाय माहिती भरण्यात आली. त्यानंतर आरओ शैलेश नवाल यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी झालेले अंतिम मतदान जाहीर केले. मात्र काही दिवसांनी आयोगाने पुन्हा सुविधा पोर्टलसाठी लिंक दिली. यावेळी तफावत असलेल्या मतदारसंघातील मतदानाची आकडेवारी त्यामध्ये भरण्यात आली.त्यामुळे आरओंनी जाहीर केलेले मतदान व सुविधावरील मतदानात फरक दिसून येत आहे. यावर आयोग काय भूमिका घेते याकडे सर्वाचर लक्ष आहे.

लोकसभा मतदारसंघात झालेल्या एकूण मतदानाची आम्ही सुविधावर पडताळणी केली. मतदानाची व मतमोजणी दरम्यानची आकडेवारी ही जुळलेली आहे.
- शैलेश नवाल,
निवडणूक निर्णय अधिकारी

संबंधित एआरओंनी दिलेल्या माहितीनुसार व सुविधा पोर्टलनुसार आयोगाला अहवाल पाठविण्यात आला. आयोगाने पुन्हा लिंक दिल्यामुळे काही एआरओंच्या आकडेवारीची दुरूस्ती करण्यात आल्याने तफावत दिसत आहे. मात्र, आकडेवारी जुळलेली आहे.
- शरद पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी

Web Title: Polling, counting of 11 votes in counting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.