रिक्त ४२ सदस्यपदांसाठी २७ फेब्रुवारीला मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 09:58 PM2018-02-24T21:58:08+5:302018-02-24T21:58:08+5:30
जिल्ह्यात ३२ ग्रामपंचायतींच्या रिक्त ३८ व सार्वत्रिक निवडणूक असलेल्या रूईपठार येथील सरपंचपदासह चार अशा एकूण ४२ पदांसाठी २७ फेब्रुवारीला पोटनिवडणूक होत आहे. या दिवशी संबंधित निवडणूक क्षेत्रात जिल्हाधिकारी यांनी स्थानिक सुटी किंवा मतदानासाठी दोन ते तीन तासांची सुटी जाहीर केली आहे.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : जिल्ह्यात ३२ ग्रामपंचायतींच्या रिक्त ३८ व सार्वत्रिक निवडणूक असलेल्या रूईपठार येथील सरपंचपदासह चार अशा एकूण ४२ पदांसाठी २७ फेब्रुवारीला पोटनिवडणूक होत आहे. या दिवशी संबंधित निवडणूक क्षेत्रात जिल्हाधिकारी यांनी स्थानिक सुटी किंवा मतदानासाठी दोन ते तीन तासांची सुटी जाहीर केली आहे.
या निवडणुकीत एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने ७६ सदस्यपदे रिक्त राहिली, तर एकच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने ७५ पदे अविरोध निवडली गेली. ३८ मतदान केंद्रांवर ही निवडणूक होत आहे. यामध्ये १८,६१५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. धारणी च चिखलदरा तालुका हे संपूर्ण क्षेत्र हे अनु. जमातीसाठी राखीव आहे. जात वैधता समितीकडे अपूर्ण कागदपत्रे असल्यामुळे उमेदवारांना पोच मिळू शकली नाही. इतर तालुक्यातील राखीव प्रभागात जात वैधतेची अशीच स्थिती असल्यामुळे बहुतांश सदस्यपदे रिक्त राहिली. या ठिकाणी आता आरक्षणात बदल करण्यात येणार आहे.
या ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणूक
अमरावती तालुक्यात इंदला, पुसदा, जळका शहापूर, भातकुली तालुक्यात आष्टी, बैलमारखेडा, कानफोडी, निरूळ गंगामाई, धामणगाव तालुक्यात तळेगाव दशासर, वळगाव, रासदी, हिंगणगाव नांदगाव खंडेश्वर तालुक्यात दाभा, चांदूररेल्वे तालुक्यात चांदूरवाडी, मोर्शी तालुक्यात आष्टोली, दापोरी, गोराळा वरूड तालुक्यात राजुरा बाजार, बेलोरा, चांदूरबाजार तालुक्यात जवळा शहापूर, अंजनगाव सुर्जी तालुक्यात सातेगाव, खिराळा, कारला दर्यापूर तालुक्यात सामदा, पिपंळखुटा चिखलदरा तालुक्यात मेहरीआम, आवागड, कोयलारी, सोनापूर, गडभांडूम, धारणी तालुक्यात राणापीसा, चाकर्दा, बोबदो, चेडो येथे पोटनिवडणूूक होत आहे.
२६ ते २८ पर्यंत दारूचे दुकान, बार बंद
ग्रामपंचायत पोटनिवडणूक निमित्याने निवडणूक क्षेत्रातील मद्यविक्रीची बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहे, तर यासर्व ठिकाणी मतदानाच्या दिवशी असणारे आठवडी बाजार बंद ठेवण्यात येणार आहे. या सर्व ठिकाणी निवडणूक कामकाजासाठी २६ ते २८ तारखेपर्यंत वीजपुरवठा खंडित करू नये अशा सूचना जिल्हाधिकाºयांनी दिल्या आहेत.